30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीय'शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका'

‘शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका’

टीम लय भारी

नाशिक: शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका असे भावनिक आवाहन सुनिल बागुल यांनी केले आहे. पाहिजे तर आम्ही उध्दव साहेबांशी बोलू. या भांडणात सामान्य शिवसैनिकाची परवड होते आहे. असेही ते यावेळी म्हणाले. सुनिल बागुल हे नाशिकचे शिवसेनेचे उपनेते आहेत. चार दिवसांपासून शिवसैनिक आणि शिंदे समर्थक रस्त्यावर उतले आहे. अनेक ठिकाणी कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. तसेच हाणामारी देखील करण्यात आली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. राजकारणी आपसात भांडत आहेत. त्यामुळे सामान्य शिवैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता शिवसैनिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. आपण आता कोणता मार्ग निवडावा हाच खरा प्रश्न सामान्य शिवसैनिकांपुढे उभा राहिला आहे.

माथेरानचे शिवसैनिक नगर सेवक प्रसाद सावंत यांच्यावर एकनाथ शिंदे समर्थकांनी हल्ला केला. ते रुग्णालयात उपचार घेत होते. काल जयसिंगपूर शिवसैनिक आणि यड्रावकर यांच्यात राडा झाला होता. दोन्ही बाजूच्या 200 जणांवर गुन्हा दाखल झाले आहेत. भरत गोगावले समर्थक रस्त्यावर उतले. बंडखोर आमदारांच्या प्रतिमेला काळं फासून जळगावमध्ये शिवसैनिकांनी निषेध केला. ठाण्यात फटाके फोडून शिंदे समर्थक गटाने शिवसेनेचा निषेध केला. यवतमाळमध्ये संजय राठोडच्या पुतळयाचे दहन करुन निषेध व्यक्त केला.

गोंदीयाचे आमदार विनोद आग्रवाल यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. शिर्डीमध्ये शिंदे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाली. अशा प्रकारे राज्यात ठिकठिकाणी शिवैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये सातत्याने वादविवाद होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवैनिकांची परवड होत आहे.

 

हे सुद्धा वाचा:

राजकारणाच्या वादळात मराठी अभिनेत्यांनी घेतली उडी

लवकरच पेट्रोल 33 रुपयांनी स्वस्त; बिअर 17 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी