35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयफुटीर आमदार अनिल बोरनारे मलिदा खाणारे, शिवसेना मेळाव्यात चंद्रकांत खैरेंचा घणाघात !

फुटीर आमदार अनिल बोरनारे मलिदा खाणारे, शिवसेना मेळाव्यात चंद्रकांत खैरेंचा घणाघात !

टीम लय भारी

औरंगाबादः राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. दोन दिवस औरंगाबादमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस पडला. या पावसात वैजापूरच्या शिवसेनेतील घाण वाहून गेली. असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वैजापूरचे बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांना लगावला. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. वैजापूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात चंद्रकांत खैरेनी बोरनारे यांच्यावर घणाघाती टीका केली. कार्यकत्र्यांच्या नावावर बोरनारे मलिदा खात होते, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

बोरनारे हे पैशांचे भुकेले आहेत. सरकारने त्यांना भरघोस निधी दिला. सेनेच्या जीववार ते आमदार झाले. बोरनारेंना मीही निधी मिळवून दिला. परंतु त्यांनी मला उघ्दघाटनाला देखील बोलावले नाही. बोरनारे यांनी पुढील निवडणूक लढून दाखवावी असे आव्हान त्यांनी दिले. तसेच अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे व संजय मिसाळ हे आपले असतील तर त्यांनी पुन्हा परत यावे. या वेळी चंद्रकांत खैरे यांनी बोरनारेच्या जवळच्या एकाला चांगलीच तंबी दिली. ती व्यक्ती बोरनारेंचा सल्लागार आहे. तुम्हाला बोलावले तर तुम्ही तिकडे जावू नका. बोरनारेंना समाजावून सांगा. असा सल्ला त्यांनी दिला.

हे सुध्दा वाचा:

‘शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका’

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन

राजकारणाच्या वादळात मराठी अभिनेत्यांनी घेतली उडी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी