राजकीय

Chitra Wagh On Sanjay Rathod : चित्रा वाघ कडाडल्या, संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या प्रकरणी वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता पुन्हा एकदा नव्या सरकारच्या मंत्री मंडळात संजय राठोड यांना स्थान देण्यात आले आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चिट मिळालेली असली तरी, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मात्र उघड नाराजी दर्शविली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. संजय राठोड या व्यक्तीला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं, हे दुर्दैवी आहे अशी भावना चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे. नव्या सरकारचा संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याच्या निर्णयामुळे चित्रा वाघ या नाराज झाल्याचे दिसून येत आहे.

शिंदे-भाजप सरकारला अखेर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला. या मंत्रिमंडळात भाजपने त्यांच्या जुन्या मंत्र्यांची मंत्रीपदी वर्णी लावली. तर एकनाथ शिंदे यांच्या गटातून मात्र घोटाळेबाज आणि मलीन प्रतिमा असणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या गटातील संजय राठोड यांच्यावर पुण्यातील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोप करण्यात आले होते. पण पोलिसांच्या तपासात संजय राठोड यांना याप्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे.

दरम्यान, संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी क्लीनचिट मिळालेली असली तरी, भाजप नेत्या चित्र वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे.. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे.. माझा न्याय देवतेवर विश्वास.. लडेंगे….जितेंगे.. @CMOMaharashtra’ असे ट्विट चित्र वाघ यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या या ट्विटमुळे शिंदे-भाजप सरकारमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच शिंदे-भाजप सरकारमधील दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीय यांच्यात वाद वाढताना दिसून येत आहे. तर आता भाजपच्या चित्र वाघ विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील नवे मंत्री संजय राठोड असा देखील वाद वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

Eknath Shinde Cabinet Expansion : सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राठोडांना मंत्रीपद मिळाल्याचा मनापासून आनंद

Maharashtra Cabinet : ‘अब्दुल सत्तार शिक्षणमंत्री होतील’

परिणामी, याबाबत नव्या सरकारमधील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता चित्रा वाघ यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता संजय राठोड यांना मंत्रीपदी पुन्हा एकदा घेण्यात आल्याच्या निर्णयावरून भाजपने तरी हात झटकले असल्याचेच दिसून येत आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

1 hour ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

2 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

3 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

3 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

4 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

4 hours ago