28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रMaharashtra Cabinet : 'अब्दुल सत्तार शिक्षणमंत्री होतील'

Maharashtra Cabinet : ‘अब्दुल सत्तार शिक्षणमंत्री होतील’

टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावे आल्याने सत्तार आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या संपुर्ण पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना डावलणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विधीमंडळ परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर विधीमंडळ सचिवांनी सुद्धा आज तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सगळ्याच घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत कारण मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला असून मंगळवारी हा बहुप्रतिक्षित सोहळा पार पडणार आहे. यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यामध्ये ED सरकार अब्दुल सत्तारांना पुढचा शिक्षणमंत्री करतील असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. 

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर अब्दुल सत्तार यांना मिश्कील टोला लगावत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत त्यांनी भाष्य केले आहे. सूरज चव्हाण ट्वीटमध्ये लिहितात, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे व त्यांना चांगल्या पदी बढती देणारे ED सरकार अब्दुल सत्तार यांची कार्यतत्परता पाहून पुढचा शिक्षणमंत्री करतील असे म्हणून त्यांनी नव्या सरकारमधील संभाव्य मंत्रिपदाची मिश्कील शब्दांत थट्टा उडवली आहे.

हे सुद्धा वाचा

MNS MLA Raju Patil : तुमचं सगळं ओक्के, जनतेच्या प्रश्नांचे काय ? मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावले

Kothurne Rape : कोथुर्णे बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ ‘अॅक्शन मोड’मध्ये

Abdul Sattar : शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोर अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत !

दरम्यान टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावे आल्याने सत्तार आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी एका एजंटला पैसे देऊन शिक्षक भरतीची परीक्षा पास झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या घोटाळ्याबाबतचे सगळे आरोप फेटाळून लावत अब्दुल सत्तार यांनी हे कोणी कटकारस्थान रचल्याचे माध्यमांना सांगितले आहे. या संपुर्ण पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना डावलणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी