28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमंत्रालयEknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली...

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

एकनाथ शिंदे मंत्रीमंडळामध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व संजय राठोड (Sanjay Rathod) या दोन वादग्रस्त आमदारांना अखेर मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. हे दोघेही नेते वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु जनभावनेची पर्वा न करता या दोघांनाही मंत्रीमंडळात स्थान दिले आहे.

एकनाथ शिंदे मंत्रीमंडळामध्ये अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व संजय राठोड (Sanjay Rathod) या दोन वादग्रस्त आमदारांना अखेर मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. हे दोघेही नेते वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु जनभावनेची पर्वा न करता या दोघांनाही मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा कालच (ता. 8 आॅगस्ट) शिक्षक भरती घोटाळ्यातील समावेश उघड झाला होता. त्यामुळे सत्तार यांचा मंत्रीपदाचा पत्ता कापला गेल्याची चर्चा सुरू झाली होती. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

उद्धव ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार व संजय राठोड हे दोघेही मंत्री होते. एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर पोलिसांच्या तपासात त्यांना क्लिन चीट मिळाली. मंत्रीपद पुन्हा मिळेल या आशेने ते शिंदे गटात सामील झाले होते. त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता नव्हती. पण त्यांनी एकनाथ शिंदे यांचा पिच्छा पुरवला. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते काल नांदेड दौऱ्यातही सहभागी झाले होते. त्यानंतर ते सपत्नीक एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सुद्धा गेले होते. त्या पार्श्वभूमीवर राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे गटाची तातडीची बैठक,  मंत्रीमंडळ विस्ताराअगोदर नाराजीचा घोळ !

Eknath Shinde cabinet Expansion : पहिल्या दिवशी मंत्रीपदाची झूल, दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या औताला झुंपणार !

Eknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना मंत्रीमंडळात स्थान नाही

उद्धव ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्यमंत्रीपद होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत सुरूवातीपासून सत्तार सहभागी झाले होते. परंतु काल त्यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यामध्ये आली. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता दुरावली होती. मात्र त्यांच्याही गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.

नव्या मंत्र्यांची नावे
भाजप – चद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा

शिवसेना – संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, तानाजी सावंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी