राजकीय

काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं, निधी मिळवण्यात पटकावला दुसरा क्रमांक

टीम लय भारी

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन नंबरवर असलेली राष्ट्रवादी निधी मिळवण्यात अव्वल ठरली आहे. तर सर्वाधिक संख्याबळ आणि मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असूनही शिवसेना निधी मिळण्यात सर्वात मागे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे(Congress is in third place in power, got more funds)

महाविकास आघाडी सरकारमध्ये नंबर दोन असलेली राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र अव्वल ठरली आहे. ज्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे ती शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर असल्याच आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही -चंद्रकांत पाटील

बाळाचा जन्म होताच मिळणार आधार कार्ड, UIDAI च्या नव्या उपक्रमाबद्दल जाणून घ्या

विकासनिधी मिळवण्यात शिवसेनेचे युवाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे. एका आकडेवारीनुसार शिवसेनेच्या 56 आमदारांना एकूण 55, 255 कोटी निधी विकासकामांसाठी मिळाला आहे.

आधी खळखळ, नंतर घबाड

दुसरीकडे काँग्रेसचे एकूण 43 आमदार आहेत. काँग्रेसचं सत्तेतील स्थान तिसरं आहे. पण निधी मिळवण्यात काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसला एकूण एक लाख 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मागे निधी मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसने केली होती.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचितची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

Congress MLA’s Outrageous “Enjoy Rape” Remark Embarrasses Party In Delhi

त्यावरून नाराजीही व्यक्त केली होती. हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला होता. त्यानंतर काँग्रेसला चांगलाच निधी मिळाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.

कुणाला किती निधी?

या निधी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे आहे. राष्ट्रवादीचे एकूण 53 आमदार आहेत. राष्ट्रवादी सत्तेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पण निधी मिळवण्यात राष्ट्रवादीने बाजी मिळवली आहे. राष्ट्रवादीला 2 लाख 24 हजार 411 कोटींचा निधी मिळवला आहे. 2020-2021मधील हे आकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थमंत्रीपद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी मिळालाय का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

राष्ट्रवादीकडे चौपट निधी

शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असताना सर्वाधिक जास्त आमदार संख्या असतानाही त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या विभागांना शिवसेनेपेक्षा चौपट निधी मिळाला आहे. तर शिवसेनेच्या दुप्पट निधी मिळवून घेण्यास काँग्रेस यशस्वी झाली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

22 mins ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

16 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

17 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

17 hours ago