राजकीय

Congress party : काँग्रेस पक्षाच्या जुलबंदीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचे मौन

काँग्रेस पक्षामध्ये (Congress party) 15 दिवसांपासून जुगलबंदी सुरु आहे. यावर महराष्ट्रातील काँग्रेसचा एकही नेता एक  शब्द देखील बोलत नाही. या प्रकरणात त्यांनी मौन धरले आहे. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एक प्रकारची उदासीनता आली आहे असे म्हटले तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. कारण गेल्या पंधरा ‍दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जुगलबंदी सुरु आहे. या मध्ये महाराष्ट्रातून कोणत्याच हालचाली दिसून आल्या नाहीत. आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. परंतु महाराष्ट्रातून एकही नेता या पदासाठी उत्सुक नाही. या विषयी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. या पदासाठी आपल्या राज्यातून कोणीही अर्ज करणार नाही. तरी देखील सांगता येत नाही आज दिवस भरात कोणी अर्ज दाखल करु शकतो.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत हे अध्यक्षपदासाठी सुरुवातीपासून उत्सुक होते. त्यांनी आपला निर्णय मागे घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या शिवाय द्विग्विजय सिंग आणि शश‍ि थरुर यांची नावे देखील आघाडीवर होती.

हे सुद्धा वाचा

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून सज्ज

Dasara Melava : शिंदेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

Repo Rate बापरे ! एका वर्षात चार वेळा वाढले रेपो रेट

राजस्थान काँग्रेसमध्ये (Congress party) गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय घमासान सुरू आहे. अशोक गेहलोत यांनी अध्यक्ष बनण्यासाठी नकार दिला आहे. सचिन पायलट यांनी सोन‍िया गांधींची भेट घेतली. त्यानंतर पुढचा निर्णय पक्ष घेईल असे सांगितले. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार तसेच काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल.

साधारणपणे 20 सप्टेंबरपासून हे घमासान सुरू आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या या परस्थितीनंतर अशोक गेहलोत यांनी सोन‍िया गांधींची माफी मा‍ग‍ितली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये राजस्थानमध्ये जुगलबंदी सुरू आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोघांमध्ये ही जुगलबंदी सुरु आहे.

अशोक गेहलोत यांच्या गटात 100 हून अधिक आमदार आहेत. तर सचिन पायलट यांच्या गटात 20 आमदार देखील नाहीत. आता तर या दोघांनी देखील सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ होऊ शकतो अशी परिस्थ‍िती काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. दोन दिवसांत या विषयावर न‍िर्णय होईल असे केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. मात्र या राजकारणात महाराष्ट्रातील एकही काँग्रेसच्या एकाही नेत्याने वक्तव्य केले नाही.

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

10 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

11 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

13 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

16 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

16 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

19 hours ago