महाराष्ट्र

Shivsena : शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचे आधारस्तंभ अडकले शिवबंधनात

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि शिंदेगटामध्ये मोठमोठ्या नेत्यांना आपल्या बाजूला ओढण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शिवसेनेच्या हक्कावरून सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत दोन्ही गट एकमेकांना धक्का देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहित. अशातच आता शिंदेगटातील मंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ असलेल्या पोहरादेवीतील प्रतिष्ठीत बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सध्या मंत्री संजय राठोड यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हंटले जात आहे.

राज्याचे सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघात बंजारा समाजाच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. याच बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी संस्थाताने महंत सुनील महाराज आहेत. याआधी संजय राठोड यांना राज्यात मंत्रीपद मिळावे यासाठी सुनील महाराज यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर संजय राठोड उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात मंत्री होते. पुढील काळात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सर्वत्र गाजले. याप्रकरणात नाव आल्याने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. त्यावेळीही बंजारा समाजाला सोबत घेऊन संजय राठोड यांची पाठराखण करण्यामध्ये सुनील महाराज अग्रस्थानी होते.

हे सुद्धा वाचा

Dasara Melava : शिंदेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून सज्ज

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार, अजित पवारांचा टोला

गेल्या काळात महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना संजय कराठोड हे शिंदेगटात सामील झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मंत्रीमंडळात संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर संजय राठोड यांनी सुनील महाराज आणि इतर महंतांना भेट नाकारल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळीपासूनच संजय राठोड आणि पोहरादेवी संस्थानाच्या महंतांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ताही दिवसांपूर्वी महंत सुनील महाराज यांनी आपण नवरात्रीत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती देिली हेती. मात्र, आता त्यांचा हा निर्णय संजय राठोड आणि शिंदे सरकारसाठी धोक्याचा ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, सुनील महाराजांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांना शिवबंधन बांधले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी “साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे म्हटले जाते. दसराजवळ आला असताना महंत शिवसेनेत आले आहेत. ज्यांना आम्ही न्याय दिला. त्यांनी पाठित खंजीर खुपसला” असं म्हणत पुन्हा एकदा शिंदे गटाला टोमणा मारला आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

2 hours ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

2 hours ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

3 hours ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

4 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

4 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

4 hours ago