33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeमुंबईVande Bharat Express : 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून सज्ज

Vande Bharat Express : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन मुंबईकरांच्या सेवेसाठी उद्यापासून सज्ज

उद्यापासून 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार असून लांबचा प्रवास कमी वेळात पुर्ण करणे आता शक्य होणार आहे. सदर ट्रेन गांधीनगर ते मुंबई अशी धावणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखद होणार आहे. उद्यापासून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार असून लांबचा प्रवास कमी वेळात पुर्ण करणे आता शक्य होणार आहे. सदर ट्रेन गांधीनगर ते मुंबई अशी धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि. 30 सप्टेंबर) या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. सकाळी 10.30 वाजता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून या ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आणि गांधीनगर ते कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत त्यांनी स्वतः प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. सदर ट्रेन उद्यापासून नियमितपणे मुंबईकरांना सेवा पुरवण्यास सज्ज असणार आहे.

महाराष्ट्रात प्रथमच सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही सुपरफास्ट ट्रेन म्हणून गणली जाते. या ट्रेनमधून जास्त लांबीचा प्रवास कमी वेळात करणे सगळ्यांना शक्य होणार आहे. ही ट्रेन सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेस असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रेनची निर्मिती भारतातच करण्यात आली असून सेमी सुपरफास्ट वर्गवारीत तिचा समावेश करण्यात आलेला आहे. संपुर्ण ट्रेन वातानुकूलित असून यामध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कार असे दोन क्लास प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : प्रसिद्ध अभिनेतेच्या मुलाला देवाज्ञा! सिनेसृष्टीत शोककळा

Cricket New Rule : 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमांत बदल; जाणून घ्या कसे आहेत नवे नियम

Bomb Blast : शिक्षण संस्थेत बाॅम्ब हल्ला, 19 जणांनी गमावले प्राण

या ट्रेनची वेळ नेमकी काय असेल याबाबत मुंबईकरांना चिंता करण्याची अजिबातच गरज नाही, याचे वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल दररोज सकाळी 6.10 ला सुटेल, तर दुपारी 12.30 पर्यंत गांधी स्थानकात पोहोचेल. गांधी नगर वरून मुंबईला यायचे झाल्यास ही ट्रेन दुपारी 02.05 ला सुटेल आणि सायंकाळी 8.35 ला मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.

सुपरफास्ट ट्रेनच्या तिकीटाबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती, तर त्याचे दर सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. मुंबई-अहमदाबाद चेअर कारसाठी (सीसी) 1385 रुपये आणि एक्झिकेटिव्ह कारसाठी (ईसी) 2505 रुपये असे तिकीट दर ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून या ट्रेनमध्ये काही सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम,आपत्कालीन स्थितीसाठी प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन सिग्नल, क्रश प्रोटेक्शन मेमरी सह ड्रायव्हर आणि कार्डचे संभाषण रेकॉर्ड करणारी सिस्टीम, ॲडव्हान्स फायर डिटेक्शन सिस्टीम, पॅसेंजर आणि गार्ड मधील संभाषणाचे रेकॉर्डिंग करणारी सिस्टीम, सेंट्रलाइज कोच मॉनिटरिंग सिस्टीम, डब्यातील जंतूंचा नाश करणारी हवा शुद्ध करणारी यंत्रणा अशा सुविधा ट्रेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बहुप्रतिक्षेत असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा सुखद प्रवास उद्यापासून मुंबईकरांना अनुभवायला मिळणार हे नक्की.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी