राजकीय

देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचे ‘ कांड ‘ बाहेर काढणाऱ्या व्यक्तीवर ईडीची धाड

जनतेने तोंडात शेण घातले तरी चालेल, पण रावणाप्रमाणे पापे करितच राहायचे असा भारतीय जनता पक्षाने चंग बांधलेला दिसतोय(Devendra Fadanvis made an ED action for MLA Jaykumar Gore against Dr dipak Deshmukh). कारण भाजपचे आमदार जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांनी कोरोना काळात मृत झालेल्या शेकडो रुग्णांना जिवंत दाखवले व त्या आधारे सरकारकडून कोट्यावधी रुपयांचे अनुदान लाटले आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख यांच्या घरावर सकाळी सात वाजता ईडीने धाड टाकली आहे .

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले
धक्कादायक म्हणजे, दीपक देशमुख व त्यांचे चुलत बंधू हिंमत देशमुख हे घरातच नाहीत. घरात फक्त महिला व लहान मुले आहेत. या महिला व लहान मुलांवर ईडीचे अधिकारी दमदाटी करीत आहेत. देशमुख कुटुंबातील एका सदस्यानेच ‘ लय भारी’ला फोन करून ही माहिती दिली आहे. जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी रावणाप्रमाणे ही आमच्या कुटुंबाविरोधात खोटी कारवाई केली आहे. पण कितीही कारवाई केली तरी देशमुख कुटुंबीय शांत बसणार नाही. कोरोना काळात मृत व जिवंत रुग्णांच्या नावाने सरकारकडून खोट्या पद्धतीने अनुदान लाटणाऱ्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात आम्ही कुटुंबीय मरेपर्यंत लढा देत राहू, असे देशमुख कुटुंबातील या सूत्राने सांगितले.
ईडीच्या झोन-२ मुंबई कार्यालयातून हे अधिकारी सकाळी ७ वाजता अचानक घरी धडकले. दोन उच्च अधिकारी व त्यांच्यासोबत २२ CRPF च्या जवाणांनी आमच्या घरावर धाड टाकली आहे. दीपक देशमुख(Dipak Deshmukh) कुठे आहेत, हिंमत देशमुख कुठे आहेत ते सांगा नाहीतर तुम्हालाच तुरुंगात टाकतो, अशी दमदाटी हे अधिकारी महिलांना करीत आहेत. घरात कागदपत्रांची उलथापालथ करीत आहेत. ही बातमी प्रसिद्‌ध होईपर्यंत (दुपारी १ वाजेपर्यंत) अधिकाऱ्यांचे घरातील महिलांना दमदाटी करणे सुरुच होते.

आमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये : प्रशांत विरकर
देशमुख कुटुंबियांचे मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथे घर आहे. येथे ही सदर धाड टाकण्यात आली आहे. या घराशेजारीच देशमुख कुटुंबाची दुध डेअरी आहे. या डेअरीतील कर्मचाऱ्यायांना बोलावून ईडीचे अधिकारी दमदाटी करीत असल्याचे देशमुख कुटुंबीयांनी सांगितले.
देशमुख कुटुंबातील प्रमुख डॉ. एम. आर. देशमुख यांनी सामाजिक हेतूने मायणी येथे वैद्यकीय महाविदयालय सुरु केले आहे. हे महाविद्यालय जयकुमार गोरे यांनी पाच वर्षांपूर्वी हडपले होते.

जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना मदत केली. पण सर्वोच्च न्यायाल‌याने हे महाविद्यालय देशमुख कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मात्र त्या अगोदर साधारण तीन वर्षे हे महाविद्यालय जयकु‌मार गोरे यांच्या ताब्यात होते. कोरोना काळात त्यांनी अनेक गैरप्रकार केले होते. पहिला गैरप्रकार त्यांनी एका दलित शेतकऱ्याच्या खोट्या सह्या करून त्याच्या शेतातून रस्ता काढला होता. त्यावरून जयकुमार गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गोरे यांना अटक कर‌ण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. गोरे यांच्या या पापात भाजपने सहकार्य केले अन् गोरेंना अटकेतून वाचविले. महाविद्याल‌याचे संस्थापक डॉ. एम.आर. देशमुख व त्यांचे भाऊ आप्पासाहेब देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. हे दोन्ही बंधू अजून तुरुंगातच आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरेचे नवे प्रकरण १० दिवसांपूर्वी बाहेर काढले होते. करोना काळात मृत झालेल्या रुग्णांवर जिवंत असल्याचे दाखवून सरकारी अनुदान गोरे यांनी लाटले आहे.

मृतांवर रुग्णांच्या खोट्या सह्या केल्या आहेत हेत डॉक्टरांची खोटी स्वाक्षरी केली आहेत व रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले अन् शासनाचेही अनुदान बेतले आहे.
यावर डॉ. दीपक देशमुख यांनी १० दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाने सातारा पोलीस तसेच सरकारी वकीलांना फैलावर घेतले. ‘पुरावे समोर दिसत असताना तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही’ अशा शब्दांत न्यायालयाने खडसावले. तुम्ही पडताळणी करा आणि जर पुरावे मिळाले तर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी सज्जड ताकीद न्यायालयाने सातारा पोलिसांनी दिली आहे. त्यावर सातारा पोलिसांनी आमदार जयकुमार गोरे यांनाच संरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. खरेतर, जयकुमार गोरे यांच्या हातात आतापर्यंत बेड्या पडायला पाहिजे होत्या. परंतु ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या डॉ.दीपक देशमुख यांच्या घरावरच ईडीची धाड टाकून भाजप सरकारने ‘गुंडांना संरक्षण, सज्जनांचा ईडीची कारवाईचा संदेश दिला आहे.

 

तुषार खरात

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

10 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

13 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

14 hours ago