33 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरराजकीयजयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत बजेट वरील चर्चेत सहभागी होताना वाळू चोरीचा मुद्दा हिरीरीने मांडला. सातारा जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आणि माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी वाळू चोरीचा मुद्दा मांडताना सन २०२१-२२ आणि २०२२-२३ सालच्या ऑनलाईन वाळू लिलावामध्ये घोटाळा झाल्याचे सांगितले, तसेच वाळू वाहतुकीसाठी परवाना देणाऱ्या शौर्य टेक्नोसॉफ्ट कंपनीने खोट्या पावत्या छापून अपहार केल्याबद्दल चौकशी करण्याची विनंती केली. योगायोगाने या कंपनीचे संचालक सुद्धा माण तालुक्यातील असल्याने आणि त्यांची राष्ट्रवादीशी जवळीक असल्याने गोरेंनी केलेली चौकशीची मागणी ही तथ्याला धरून आहे कि यामध्ये राजकारण आहे हे स्पष्ट आहे. (Jayakumar Gore raised the issue of sand theft in the Legislature, is there politics in Mana Taluka?)

म्हसवड परिसरामध्ये आजही अनेक वाळू माफिया माणगंगेची वाळू प्रशासनाच्या आशीर्वादाने लुटत आहेत आणि ते वाळूमाफिया लोकप्रतिनिधींच्या जवळचे असल्याचे सर्वश्रुत आहे, असे असताना सुद्धा सध्याच्या तुफान वाळू चोरीची चर्चा न करता, वाळू चोरी साठी रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करणाऱ्या कंपनी विरोधात तक्रार म्हणजे चोर सोडून संन्यास्याला फाशी असा प्रकार आहे. जर आमदार गोरे यांना माण तालुक्याच्या जनतेविषयी कळवळा असता तर आमदार गोरे सध्या चालू असलेल्या वाळू लुटीबद्दल बोलले असते, शेतकऱ्यांची जबरदस्तीने होणारी वीजबिल वसुली बद्दल बोलले असते, अपुऱ्या दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल बोलले असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माण तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या एमआयडीसी बद्दल बोलले असते. पण जनतेच्या विषयांवर बोलतील ते गोरे कसले, ते फक्त स्वतः पुरते बोलले.

हे सुद्धा वाचा 

रश्मिकाची अस्सल मराठमोळी नृत्य अदाकारी..! 

…असे होत राहिले तर हळूहळू महाराष्ट्र खिळखिळा होईल: आमदार भास्कर जाधव 

मुंबईची आर्थिक सत्ता उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाड कडाडले  

माण तालुक्यातील युवा नेत्याच्या वाढत्या प्रभावामुळे २०२४ च्या निवडणुकीमध्ये स्वतःचा पराभव दिसू लागल्याने त्याच्या कंपनीवर आरोप केले आणि तसेच स्वतःवरच्या आरोपांची चौकशी निष्पक्षपणे करणारे प्रामाणिक पोलीस अधिकारी डीवायएसपी निलेश देशमुख आणि पीआय मालोजीराजे देशमुख यांचे निलंबन करण्याची मागणी सभागृहात केली. सभागृह हे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असते, स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी नसते याचा बहुतेक आमदार महोदयांना विसर पडलेला दिसतोय. यावरून असे दिसते कि आमदारांना जनतेचे काही पडलेले नाही. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना जनतेने आमदारकी दिली आहे काय? असा प्रश्न माणदेशी जनतेला पडलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी