29 C
Mumbai
Sunday, May 21, 2023
घरमहाराष्ट्रआमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये : प्रशांत...

आमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये : प्रशांत विरकर

माण तालुक्यातील बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामावरुन श्रेयवाद लाटण्याचे काम स्थानिक आमदार जयकुमार गोरे घेत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत विरकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामामध्ये आमदार गोरे यांचे कुठलेही योगदान नाही, रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी हा रस्ता मंजूर करुन घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे पाठपूरावा करुन निधी उपलब्ध करुन घेतल्याचे प्रशांत विरकर यांनी म्हटले आहे.  (MLA Jayakumar Gore should not take credit for Bijwadi-Yelewadi road work!)
प्रशांत विरकर यांनी म्हटले आहे की, बिजवडी व परिसरातील अनेक विकास कामे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सत्ता नसताना देखील आमच्या कौशल्यावर मार्गी लावत असल्यामुळे लोकप्रतिनिधींना या गोष्टी सहन होत नाहीत. सलग तीन टर्म आमदार होऊन देखील बिजवडी येळेवाडी या मुख्य रस्त्याचे काम ते मार्गी लावू शकले नाहीत पण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर व पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मागील सरकारच्या काळात आम्ही हा रस्ता मंजूर करून घेतला पण निधी अभावी हे काम सुरु होऊ शकले नाही नंतर च्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना मी दादांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला व हे काम आम्ही पूर्णत्वास नेले याचाच राग कदाचित लोकप्रतिनिधींच्या मनात असावा.

प्रशांत विरकर म्हणाले, येळेवाडी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विकास कामे झाली आहेत त्यामध्ये तीन पाझर तलाव, चार सिमेंट नाला बांध, दडसवाडा येथील नळ पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळेच्या येळेवाडी पिंपराळे येथील खोल्या अंगणवाडीसाठीच्या खोल्या पिंपराळे येथील खासदार फंडातील स्ट्रेट लाईट पोल त्याचबरोबर अनेक नाला बिल्डिंगच्या ताली अशा अनेक कामे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहेत. त्याचप्रमाणे येळेवाडी ते टाकेवाडी फाटा या दरम्यानचे रस्त्याचे काम गेली तेरा वर्ष अपुरे होते मागील तेरा वर्षात आमदारांना हा अपुरा रस्ता दिसला नाही का ? आम्ही प्रयत्न केल्यानंतर हा रस्ता मंजूर होतोय हे लक्षात येताच घाई गडबडीने उपमुख्यमंत्र्यांना बजेटच्या आधी पत्र देऊन कांगावा करण्याचे काम आमदारांनी केले. येळेवाडी बद्दल तर तुम्ही नेहमीच तिरस्कार केला पाणी फाउंडेशन च्या कामासाठी फुटक्या कवडीची सुद्धा मदत आपण येळेवाडी पाणी फाउंडेशनला केली नाही.

हे सुद्धा वाचा 
जयकुमार गोरे यांना वाळू चोरीचा कळवळा की, पायाखालची वाळू सरकली ?

शरद पवार आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीला; रुग्णालयात जावून केली तब्बेतीची विचारपूस 

जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबरला धमक्या, सेलेना गोमेझचा खुलासा

जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत आम्ही चार बंधारे येळेवाडीत केले. आपण आपल्या स्थानिक विकास निधीतून एकही बंधारा येळेवाडी साठी दिला नाही. उलट सभामंडपा सारखी एक दोन कामे देऊन बोळवण केलीत. एवढेच जर काम करण्याची हिंमत असेल तर सतोबा देवस्थानच्या पायथ्याचा घाटाच्या दरम्यानचा वनविभाग क्षेत्रातील रखडलेला रोड त्यांनी आपल्या कौशल्यावर येत्या सहा महिन्यात पूर्ण करून आपले कौशल्य दाखवून द्यावे आम्ही त्यांचा यात्रेत जाहीर सत्कार करू. पण उगाच दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रकार थांबवावा माण खटाव विधानसभा मतदारसंघात इतर ठिकाणी तुमचे फुकटचे श्रेय घेण्याचे प्रकार खपवून घेतले जातील परंतु मी माझ्या व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नातील कामांचे फुकटचे श्रेय घेऊ देणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल याची दक्षता इथून पुढे लोकप्रतिनिधींनी घ्यावी, असे प्रशांत विरकर यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी