कोल्हापूर पोटनिवडणूकीतून महाविकास आघाडीला घरी पाठवू : देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा-मित्रपक्षांचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शनिवारी ९ एप्रिलला संबोधित केले. कोल्हापूर ही नगरी अंबाबाईची आहे आणि या नगरीत आल्यानंतर सर्वांत पहिल्यांदा आठवण हिंदवी स्वराज्याची होते. शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर, ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. दरवेळी यायचो, तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज हिंदूत्त्वाचे नामोनिशान येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadanvis slams Mahavikas aghadi over kolapur potnivdnuk)

छत्रपतींनी युद्धाची नवीन नीती आखून तिन्ही बाजूंनी रुस्तम जमालला घेरले. त्यानंतर रुस्तम जमालला पळून जावं लागलं. त्यामुळे १० हजार सैन्याचा पराभव साडेतीन मावळ्यांनी या कोल्हापूरच्या भूमीत केला. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रुस्तम जमालला घरी पाठवलं त्याचप्रमाणे तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला या उत्तर कोल्हापूरातून घेरुन घरी पाठवायचय, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

भगव्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात

भगव्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात आहे. ही संधी गेली तर पुन्हा येथे भगव्याचे दर्शन होणार नाही.ही लढाई व्यक्तीची नाही, तर विचारांची आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 रद्द करण्याला विरोध केला, आपल्याला त्यांना परास्त करायचे आहे. यांना तर ‘काश्मीर फाईल्स’ची पण अ‍ॅलर्जी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न होता, एका झटक्यात आम्ही तो सोडवला. इथल्या पाण्याचा प्रश्न असो की विमानतळाचा, प्रत्येक विषय सोडविला. प्रश्न सोडविणार्‍या व्यक्तीचे नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कोल्हापुरात पूर आला, तेव्हा आम्ही दिलेली मदत आणि तुम्ही दिलेली मदत ही येथील लोकांच्या स्मरणात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सारेच्या सारे 100 कोटींच्या वसुलीत मग्न

तुमच्यात देण्याची दानतच नाही. तुम्ही फक्त घरं भरण्याचे काम केले. गोकूळची निवडणूक होईस्तोवर लॉकडाऊन लागू दिला नाही.निवडणूक होताच तो लागू केला. त्याकाळात ज्यांचे मृत्यू झाले, त्याचे उत्तर कोण देणार?सारेच्या सारे 100 कोटींच्या वसुलीत मग्न आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक भाजपाशासित राज्याने कमी केले

आज महाराष्ट्रात सरकार नाही, तर केवळ भ्रष्टाचार आहे.सामान्य माणूस होरपळत असताना त्याला कोणतीच मदत दिली गेली नाही. यांना पुळका दारूचा. दारु विकणार्‍याला सवलती दिल्या आणि पिणार्‍याला ती खुली करून दिली. पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक भाजपाशासित राज्याने कमी केले, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

हे सरकार आहे की सर्कस

हे सरकार 52 रुपये प्रतिलिटर आपल्या खिशात टाकतात. पण, भाव कमी करावा वाटत नाही. हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठीच्या निधीत सुद्धा भ्रष्टाचार करते. हे सरकार आहे की सर्कस? असा प्रश्न ,  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विचारलाय.


हे सुद्धा वाचा :

देवेंद्र फडणविसांनी मन मोठे केले, अन् अडचणीचा प्रश्न विचारला

महाराष्ट्रभरातील बालकांसाठी ,शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या : नाना पटोले

Devendra Fadnavis dares Maharashtra govt to slash tax on fuel

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही; तुम्हाला काय करायचे ते करा

Pratiksha Pawar

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

13 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

13 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

13 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

13 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

13 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

15 hours ago