29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणविसांनी मन मोठे केले, अन् अडचणीचा प्रश्न विचारला

देवेंद्र फडणविसांनी मन मोठे केले, अन् अडचणीचा प्रश्न विचारला

लय भारी न्यूज 

मुंबई : मेट्रो-७ व मेट्रो-२’ प्रकल्पाचा आरंभ सोहळा आज शनिवारी २ एप्रिल रोजी पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाले. या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजप नेत्यांचा तिळपापड झाला आहे. मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवले नाही, तरी चालेल. पण सर्व मेट्रो सुरू कराव्यात. मेट्रो ३ चा प्रश्न तातडीने निकाली लावावा. आतापर्यंत मेट्रो सुरू झाली असती. पण आता ती सुरू होण्यासाठी पुढील चार वर्षे लागतील, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज  महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis criticizes maha vikas aghadi)

जरुर त्यांनी मेट्रोचे उद्घाटन करावे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, जनतेला माहिती आहे की दोन्ही मेट्रोचे काम मी सुरु केले आहे. मेट्रोचं काम वेगाने सुरु असताना या सरकारमध्ये ते रखडले होते. सरकारने श्रेय नक्की घ्यावे, पण अपश्रेयाचे भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो तीनचा प्रकल्प त्वरीत सुरु करावा. आरेमधील कारशेडचे काम ९ महिन्यामध्ये होऊ शकते. महत्त्वाची असलेली मेट्रो ३ सरकारने सुरु करून त्याच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले नाही तरी चालेल, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मेट्रोचे शिल्पकार आहेत’, असे भासवण्याचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मेट्रो प्रकल्प सुरू झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis is not invited) हेच खरे मेट्रोचे शिल्पकार आहेत’, असे भासवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. चित्रा वाघ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही फडणवीस यांना ‘मेट्रोचे शिल्पकार’ बनविणारी लोणकढी थाप मारली आहे.वास्तवात मात्र मुंबईतील ‘मेट्रो रेल्वे’ हे नाव जरी घेतले तरी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव नजरेसमोर लगेच उभे राहते. मुंबई आणि महाराष्ट्रात आता मेट्रो रेल्वे हात पाय पसरू लागल्या आहेत, त्याचे खरे श्रेय स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे आहे.


हे सुद्धा वाचा :

भाजप नेत्यांनी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाणांचा उदो उदो करावा, देवेंद्र फडणविसांचा काहीच संबंध नाही !

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत 4 प्रकल्पांचे उद्घाटन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी