33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटॉप न्यूजदेवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही; तुम्हाला काय करायचे ते करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही; तुम्हाला काय करायचे ते करा

टीम लय भारी

मुंबई : फोन टॅपिंगचा डेटा लिक झाल्याप्रकरणी पोलिसांकडून मला अगोदर प्रश्नावली पाठविली होती. त्या प्रश्नावलीनुसार मला साक्षीदार बनविले जाणार होते. परंतु पोलिसांनी विचारलेले काही प्रश्न वेगळे होते. मला सहआरोपी बनविण्याचा घाट घातला जात असल्याचे या प्रश्नांमधून दिसत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधानसभा सभागृहात फडणवीस यांच्या पोलीस चौकशीचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी त्यांनी आपल्या संतप्त भावना व्य्कत केल्या.

आणीबाणीच्या कार्यकाळात इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना २ वर्षे तुरूंगात घातले होते. काकूंना १८ महिने जेलमध्ये ठेवले होते. त्यामुळे मी तुरूंगात जायला घाबरणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारला ठणकावले.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, CrPc कायद्यानुसार पोलिसांना एखाद्या प्रकरणाविषयी कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी प्रश्नावली पाठविली होती. परंतु त्याला त्यांनी उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी पोलीस फडणवीस यांना भेटायला गेले होते. पोलिसांनी पाठविलेली नोटीस ही आरोपी म्हणून नव्हती, असेही स्पष्टीकरण वळसे पाटील यांन दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी