राजकीय

धनंजय मुंडेंची भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर सणसणीत टीका

टीम लय भारी

बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ‘आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत. पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजाराने नाकारले, त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. केज नगरपंचायत निवडणुकी अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची केजमध्ये सभा झाली त्यावेळी ते बोलत होते(Dhananjay Munde criticizes BJP leader Pankaja Munde).

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत ३२ वा क्रमांक लागला. ही माहिती समोर आल्यानंतर भाजपा नेत्या आणि धनंजय मुंडेंची बहीण पंकजा मुंडेंनी भर सभेत धनंजय यांना टोला लगावला. “मी मंत्रीपदी होते तेव्हा पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझा समावेश होता. थेट ३२व्या क्रमांकापर्यंत माझं मंत्रीपद कधीच गेलं नाही,” असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर तोंडसुख घेतलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

धनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी घेणार सरकार

महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल : छगन भुजबळ

केज नगरपंचायतच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत पंकजा मुंडेना प्रतिउत्तर दिलं आहे. बीडमध्ये मुंडे बहिण भावात आरोप प्रत्यारोपाच्या फैरीवरून चांगलीच जुंपली आहे. नगरपंचायतच्या निवडणूक आखाड्यात पंकजा आणि धनंजय यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यातच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जुगलबंदी सुरू झाली.

वडवणी नगरपंचायतच्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटीची घोषणा करतात, दोन वर्ष काय टाळ कुटत होते का? असा सवाल करत उपरोधिक टोला लगावला होता.

यावर धनंजय मुंडे भडकले आणि पंकजा मुंडेंना जशास तसे प्रतिउत्तर दिले आहे. भाजपचे कमळ बिडातून गायब झालं. केज नगरपंचायतमध्ये साधा एकही उमेदवार भाजपला मिळत नाही. एवढी वाईट वेळ भाजपवर आली आहे. साधा एक उमेदवार उभा करता आला नाही तुम्हाला अन तुम्ही माझी औकात काढता. ताई औकात काढताना दोन वर्षा पूर्वीचा निकाल तर लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या वर टीका करा. कारण तुम्ही माझ्या ताई आहेत. यापूर्वी देखील 10 वेळा मी कधी तुम्ही टीका केली असेल. पण आज तुम्ही सामाजिक न्याय आणि विशेष विभागाची औकात काढली. ताई आज सामाजिक न्याय विभागाची औकात काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यातील शाळांबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Munde cousins in war of words ahead of local polls in Beed

पुढे ते म्हणले की, 2019 ला निवडणूक लढवत होता त्या वेळी महिला बालकल्याण, जलसंधारण ,ग्रामविकास या खात्याचे नंबर मला माहित नाहीत. मात्र हे सगळं असताना परळीच्या जनतेने तुम्हाला औकात दाखवून दिली, हे विसरलात का? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यापुढं संकटं असताना ताई आपण कुठे होतात? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे 502 कोटी अनुदान मिळवून दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशे जमा झाले 25% अग्रीम विमा दिला ही आमची औकात सामाजिक न्याय विभागाला कमी समजू नका. राज्यातील 35% लोकांच्या संपर्कात आहे.या विभागात काय नाही, विधवा परित्यक्ता, किन्नर, अंध अपंग, दलित वंचित आहेत. याच विभागात किती जणांचा अपमान केला. 32 व्या नंबर चे खाते 1 नंबरला नेऊ शकतो, हा विश्वास पवार साहेबांना आहे. त्यामुळं त्यांनी हे खात मला दिल.

तुमच्याकडे टॉप फाईव्ह मधील ग्रामविकास, महिला बालकल्याण, जलसंधारण, अशी महत्वाची खाते घेऊन निवडणुकीत हारालात.म्हणून “किसीं की हैसीयत और औकात पे मत जाना”.पाच वर्षात तुम्ही मंत्री असताना आमदार,खासदार, राज्यात केंद्रात सत्ता होती, तरी देखील केज मध्ये मूलभूत सुविधा नाहीत. शेवटी “मै मेरी औकात बताके रहूगा.अस म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना इशारारूपी आव्हान दिले.

Team Lay Bhari

Share
Published by
Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

8 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

8 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

9 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

10 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

10 hours ago