31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी...

धनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी घेणार सरकार

टीम लय भारी     

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एकत्रितपणे एक योजना आणली आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लय भारी ‘ला ही बातमी दिली(Dhananjay Munde’s big scheme in the name of Sharad Pawar).

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या १२ डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे एकत्रितपणे ‘शरद शेतम् ‘ नावाची योजना राबविणार आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर तपासणीअंतर्गत एखादा दुर्धर आजार निष्पन्न झाल्यास ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजनेअंतर्गत त्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे.

Dhananjay Munde : शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचा-यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश

मी येणारच, पण ते येणारच हे त्यांना काही जमेना : शरद पवार

प्रत्येक जिल्हा, तालुका तसेच शहरांमध्ये ही मोफत सेवा राबविण्यात येणार असून या सेवेचा फायदा निस्चितरूपाने ज्येष्ठ नागरिकांना होईल. त्यासाठी होणार सर्व खर्च ‘महात्मा फुले जण आरोग्य’ योजनेद्वारा केला जाणार आहे. तपासणीसाठी लागणाऱ्या टेस्टिंग लॅब तसेच इतरेतर आवश्यक यंत्रणाही उभारण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग व सामाजिक न्याय विभाग एकत्रितपणे ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी’ हा उपक्रम हाती घेणार आहेत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त हि योजना राबविण्यात येणार आहे.

भाजपानं शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप केलं; शरद पवार संतापले

Sharad Pawar had said 25 years ago that BJP is divisive but Shiv Sena realised truth in 2019: Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी