30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल : छगन भुजबळ

महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल : छगन भुजबळ

टीम लय भारी

खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत व्हर्चुअल रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल, असा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे(Chhagan Bhujbal, miracle will happen in Delhi in 2024).

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१  व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या व्हर्चुअल रॅलीत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. “मुंबई येथून रॅलीचे थेट प्रक्षेपण येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले होते. यावेळी श्री. पवार यांच्यासह प्रतिभा पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी प्रमुख नेत्यांसह भुजबळ उपस्थित होते. या रॅलीत भुजबळाचे भाषण सर्वाचे लक्षवेधी ठरले.

छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी ती कारवाई!

धनंजय मुंडे यांची शरद पवारांच्या नावाने मोठी योजना, ‘या’ दुर्लक्षित घटकांची जबाबदारी घेणार सरकार

पूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भुजबळांनी केले.

अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी

Stay on OBC quota in local body polls injustice to 54 per cent population in Maharashtra: NCP minister Chhagan Bhujbal

देशात  साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. ओबीसी समाजाला सर्व प्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासोबत अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतले. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न,धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे देखील भुजबळांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी