राजकीय

मराठ्यांना आरक्षण देणारच -एकनाथ शिंदेंचा निर्धार; भर भाषणात मंच सोडून शिवरायांची शपथ

शरीरात रक्ताचा एक थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी काम करणार, कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देणार, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आझाद मैदान येथे आयोजित दसरा मेळाव्यात केला. मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असे  सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली.

मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही वाट्याचं काढून घेणार नाही, मराठा समाजाला न्याय देणार असे सांगत एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण देताना सर्वच समाज घटकाला न्याय कसा मिळेल हे पाहिले जाईल, मराठा समाजाला निश्चितच आरक्षण दिले जाईल असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवरायांच्या पुतळ्यासमोर झुकून शब्द दिला
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाता मुद्दा तापल्याचे दिसून येत आहे.  जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत आज संपली आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या स्टेजवरूनच एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून भाष्य केले. एकनाथ शिंदे हे भाषण सुरू असतानाच शिवरायांच्या पुतळ्यासमोर गेले आणि त्या ठिकाणी नतमस्तक झाले.

हे सुद्धा वाचा
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची तुलना हिटलर, मुसोलिनीशी; आगापिछा नसलेले लोकही धोकादायक
बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी खर्चणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही- अंबादास दानवेंचा आरोप
फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, असे का म्हणाल्या सुषमा अंधारे…
तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यांनी  आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हिंमत करून, सरकार आडवं करून मी तिकडून इकडे बसलोय. तुमच्यातील एक जण उद्या मुख्यमंत्री झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तमाम जनता माझ्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पदाची कसलीही लालसा नाही. मी दावोसमध्ये जातो आणि मुंबईच्या नाल्यामध्ये उतरतो, गरीबांच्या वसतीमधील शौचालयाची पाहणीदेखील करतोय.

 

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

4 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

5 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

8 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

10 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago