27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयफडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, असे का म्हणाल्या सुषमा अंधारे...

फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, असे का म्हणाल्या सुषमा अंधारे…

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवले नाही. उलट महाराष्ट्र नासवला; अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवाजी पार्कमध्ये केली. महाराष्ट्र नशामुक्त झाले पाहिजे, राज्याचा उडता पंजाब होऊ नये म्हणून भूमिका मांडली. काहींनी अब्रू नुकसानीची नोटिस दिली, पण तीच मंडळी अंधारात मांडवली करायला येत होती, असा आरोपही त्यांनी केला. नाशिकमध्ये कोटीवधीच्या ड्रग्जची तस्करी होत असताना पालकमंत्री गोट्या खेळत होते काय, राज्य उत्पादन शुल्कमंत्री काय करतात, असा सवालही त्यांनी केला.

खरेतर राज्यात गृह खाते आहे का हा प्रश्नच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदींना संपवले. तुमचा पक्ष एवढा मोठा असेल तर आमचे मटेरियल का उचलले. भुंकणारी फौज (barking briged) तुम्ही का पोसली आहे. एक अमराठी माणसाने मराठी स्त्रीबाबत जे वक्तव्य केले तेव्हा हेच गृहमंत्री शांत बसले. देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्र नासवला. तुमच्यावर अनेकांनी टीका केली असेल पण माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय महिलेशी तुमची गाठ पडली आहे हे याद राखा, असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. पण त्यांना हे खाते सांभाळता येत नाही. राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा  कोटीवधीचा साठा  पकडण्यात आला. यात पोलिसांनी पकडलेल्या आरोपींचे काही मंत्र्यांशी संबंध असल्याचे आम्ही सांगितले. पण फडणवीस यांनी या मंत्र्यांवर कारवाई का केली नाही, असाही आरोप अंधारे यांनी केला.

हे सुद्धा वाचा
गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात धनगर आरक्षणावरून युवकाची आत्महत्या
‘रोहित पवारांची संघर्षयात्रा पक्षातील अन्यायाविरोधात…’
निलेश राणे कुरघोडीच्या राजकारणाचे बळी?

राज्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा पकडण्यात आला. हे सगळे काही पाहताना महाराष्ट्राचा उडता पंजाब होत आहे. हे थांबवण्याची राज्याच्या गृह विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजे. असे असताना फडणवीस या अमली पदार्थ तस्करीकडे दुर्लक्ष करत आहेत, यामुळे राज्याची दिवसेंदिवस उडता पंजाब होण्याकडे वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राचे नाव देशात चांगल्या अर्थाने घेतले जायचे. महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. पण याच राज्यात आता अमली पदार्थांचे पीक येऊ लागले आहे. हे सगळे काही माहीत असताना राज्याचे गृहमंत्री फडणवीस अमली पदार्थाच्या तस्करीकडे डोळेझाक करत आहे. पण हे कुठेतरी थांबण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असेही अंधारे यांनी सांगितले.

राज्य सरकारमध्ये विविध घोटाळे सुरू आहेत. या घोटाळ्याबाबत विरोधी पक्षाने आवाज उचलला तर फडणवीस यांची भुंकणारी फौज त्यांच्यावर तुटून पडते. फडणवीस यांनी हे थांबवले पाहिजे, असेही अंधारे म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी