राजकीय

गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात धनगर आरक्षणावरून युवकाची आत्महत्या

राज्यात काही दिवसांपासुन मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. या आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील एका ४५ वर्षीय आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील इतर समाजही आरक्षणाची मागणी करत आहेत. अशातच आता राज्यात आरक्षणासाठी धनगर समाज पेटून उठला आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाची मागणी करत असून  नेतृत्व करत आहेत. मात्र आता पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात एका धनगर युवकाने आत्महात्या केली असल्याची माहीती समोर आली आहे. अबाचीवाडी, कुणीकोणूर ता.जत, जि.सांगली येथे मुळगावी गळफास लावून आत्महात्या केली. याबाबत पडळकरांनी ट्वीट करत धनगर समाजाला असे पाऊल उचलू नका, असे आवाहन दिले आहे.

राज्यात काही दिवसांपासून आरक्षणाचा विषय अधिक पेटला आहे. मराठा समाजाने सरकारला आरक्षणाची मागणी केली होती. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकार या मुद्यावर तोडगा काढणार असल्याच्या अधिक चर्चा होत्या. मात्र सरकारने यावर कोणताही तोडगा न काढल्यास मनोज जरांगे-पाटील उपोषण करणार आहेत. यापूर्वी मराठा समाजातील अनेक तरूणांनी आत्महात्या केली. तर हीच परिस्थीती आता धनगर आरक्षणाबाबत पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धनगर आरक्षणावरुन तरूणाने झाडाला गळफास लावून आत्महात्या केली आहे. बिरूदेव खर्जे असे आत्महात्या केलेल्या युवकाचे नाव असून वय ३८ वर्षे होते. त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने धनगर आरक्षणावरुन आत्महात्या केली असल्याची माहीती समोर आली आहे.

हे ही वाचा

परळीतूनच निवडणूक लढवणार, पंकजा मुंडेंचे दसरा मेळाव्यात संकेत

‘रोहित पवारांची संघर्षयात्रा पक्षातील अन्यायाविरोधात…’

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

सुसाइड नोटमध्ये काय लिहले?

२२ ऑक्टोबर या दिवशी सांगली येथे धनगर मेळावा घेण्यात आला होता. यावेळी गोपाचंद पडळकर सभा घेत होते. यावेळी बिरदेव हे घरात बसून मोबाईलवर भाषण पाहत होते. फाशी घेत असताना बिरुदेवने एक चिट्ठी लिहली, त्यात धनगर समाजाला आरक्षण मिळावे, माझ्या मृत्युनंतर कोणीही कोणाला दोषी धरु नये. माझ्या कुटूंबाला मृत्यूनंतर कोणताही त्रास होणार नाही. अशी सुसाईड नोट लिहली आहे. यावर आता गोपीचंद पडळकरांनी ट्वीट करत माहीती दिली आहे.

काय म्हणाले गोपीतंद पडळकर?

भावांनो धनगर आरक्षणाचा लढा लढू आणि जिंकूही पण आपला जीव महत्वाचा आहे. कुठलही टोकाचं पाऊल उचलू नका. एक वाईट बातमी येतेय बिरुदेव वसंत खर्जे, कुणीकोणूर ता.जत, जि.सांगली या आपल्या भावाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. कृपया आपल्या कुटुंबाचा विचार करा. भावपूर्ण श्रद्धांजली. असे लिहीत पडळकरांनी बिरूदेवला श्रद्धांजली वाहीली असून धनगर बांधवांना आवाहन केले आहे.

बिरूदेवच्या अंत्यसंस्कारासाठी गोपीचंद पडळकर गेले होते. यावेळी त्यांनी बिरूदेवच्या आत्महात्येमुळे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही. मी बिरूदेवच्या मुलांचे त्यांच्या आई-वडीलांचे संगोपन करेल. आम्ही बिरुदेवचे बलिदान वाया जाऊ देणार नाही.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago