27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयपरळीतूनच निवडणूक लढवणार, पंकजा मुंडेंचे दसरा मेळाव्यात संकेत

परळीतूनच निवडणूक लढवणार, पंकजा मुंडेंचे दसरा मेळाव्यात संकेत

बीड जिल्ह्यातील सावरगावमधील भगवान बाबा गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज भव्यदिव्य दसरा मेळावा झाला. यावेळी लाखोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते, समर्थकांचे जाहीर कौतुक करत त्यांनी पक्षनेतृत्वाला काही अप्रत्यक्ष इशारे दिले. पंकजा मुंडे यांनी जवळपास तासभराच्या भाषणात कुणाचेही नाव घेता पक्ष, बीडमधील विरोधक आणि कारखान्यावर छाप्यावरून जोरदार हल्लाबोल केला. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार, त्या भाजपमध्ये नाराज आहेत का आणि असतील तर त्याबाबत जाहीर वक्तव्य करणार का? आदी अनेक मुद्द्यांवर दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण त्यांच्या भाषणात अनेक मुद्दे असूनही त्यात सलगता नव्हती.

पंकजा नाही प्रीतमच…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात नेहमीच वरिष्ठांकडून डावलले जात असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही. शिवाय राज्यात त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर मी कुणाच्याही मेहनतीचे खाणार नाही. एकवेळ ऊस तोडायला जाईन, कापूस वेचायला जाईन, पण स्वाभिमान गहाण टाकणार नाही, अशी थेट भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली. या भूमिकेला निमित्त होते ते लोकसभा निवडणुकीचे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा पर्याय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सूचवल्याचे कळते. यावरून त्यांनी प्रीतम मुंडे यांनी थेट खडे बोल सुनावले.

जनतेने कुबड्या दिल्या

निवडणुकीत लोक हरतात तशी मी देखील निवडणुकीत पडले. माझा पाय मोडला तर कुबड्या घ्यावा लागतील. कुबड्या कोण देणार पक्ष किंवा जनता. निवडणुकीत पडल्यानंतर जनतेने एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यांत मॅरेथॉन धावण्याची ताकद दिली, असा टोला त्यांनी पक्षाला लगावला. त्याचवेळी त्यांनी, मी कधीही मनाने खचले नाही असे स्पष्ट करत माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो म्हणून माफी मागते, असे सांगत जनतेसमोर हात जोडले. त्यावेळी सभेतील लोक भावूक झाले होते. दरम्यान, आता मी घरी बसणार नाही तर मैदानात उतरणार आणि आता पडणार नाही तर भ्रष्ट चारित्र्याच्या लोकांना पाडणार, असेही ठणकावून सांगितले. त्याचवेळी मला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधणार, असा  सूचक इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भिडणार; सभेचं सोनं कोण लुटणार?

निलेश राणे यांनी घेतला राजकीय संन्यास !

‘रोहित पवारांची संघर्षयात्रा पक्षातील अन्यायाविरोधात…’

पंकजा मुंडेे का चिडल्या?

पंकजा मुंडे यांच्या भाषणाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यावेळी चिडलेल्या पंकजा मुंडे यांनी तुम्ही कुणाकडून आलात अशी विचारणा केली. माझ्यासाठी आला असाल तर शांत राहा अशी समज दिली. त्यानंतर लोक शांत झाले आणि पंकजा मुंडे यांचं भाषण झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी