30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमंत्रालयराज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

‘नवी विटी, नवा डाव’ याप्रमाणे कोणतेही सरकार बदलले तर ते आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी घेतात. तर इतरांना साईडच्या पोस्ट दिल्या जातात. त्यानुसार काल राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सनदी अधिकारी हा प्रशासनाचा मुख्य घटक मानण्यात येतो. त्यानुसार नवा मंत्री आल्यावर तो आपल्या मर्जीतील सनदी अधिकारी आपल्या खात्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो. दोन दिवसांपूर्वी कृषी खात्यातील कृती आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करून त्यांच्या जागी डॉ. प्रवीण गेडाम या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

असे असताना, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कैलास पगारे यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. सचिन्द्र प्रताप यांची बदली आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. अजित बी. पवार यांची दुग्ध विकास विभागात आयुक्त म्हणून बदली झाली. एस. जी. कोलते यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सुधाकर तेलंग यांची शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात सहा महिन्यात ११३ वेळा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. १ जुलै २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत ९० वेळा विविध सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सगळ्यात जास्त वेळा बदल्या तुकाराम मुंडे यांच्या झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा 

निलेश राणेंनी एवढा मोठा निर्णय का घेतला?
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भिडणार; सभेचं सोनं कोण लुटणार?
ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज

सनदी अधिकारी हा प्रशासनाचा प्रमुख मानण्यात येतो. अनेक सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांना हाताशी धरून असलेले अनेक सनदी अधिकारी आहेत. हे अधिकारी वाऱ्यानुसार शिड बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर काही सनदी अधिकारी सत्ता कुणाचीही येवो आरामशीर काम करत असतात. सनदी अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये अनेकांचे ‘कोट’ कल्याण होत असते, असेही बोलले जाते. राज्यातील काही सनदी अधिकारी नोकरी सोडून, निवृत्त होऊन  राजकारणात गेलेले आहेत. यात श्रीनिवास पाटील आदींचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी