31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र'रोहित पवारांची संघर्षयात्रा पक्षातील अन्यायाविरोधात...'

‘रोहित पवारांची संघर्षयात्रा पक्षातील अन्यायाविरोधात…’

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘युवा संघर्ष यात्रा’ आज मंगळवारपासून (24 ऑक्टोबर) सुरू झाली आहे. राज्यातील युवांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पुणे शहरापासून सुरू होणारी ही पदयात्रा 13 जिल्ह्यांमधून सुमारे 800 किलोमीटर अंतर पार करून नागपूर शहरात पोहोचणार आहे. राज्यातील बेरोजगार युवांचे प्रश्ननागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. यावरुन, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार टीका करत, “ही यात्रा बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी नसून रोहित पवार यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे.” असे व्यक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी रोहित पवार आणि त्यांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’वर टीका केली आहे. रोहित पवार यांची निघालेली युवा संघर्ष यात्रा ही बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी, हक्कासाठी नसून स्वतः चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. रोहितदादा, एकीकडे सत्तेत असताना आपण ह्याच प्रश्नांबाबत आपण वेगळी भूमिका घेतली होती आणि विरोधात आल्यानंतर आपण वेगळी भूमिका घेतली आहे.”

“खरंतर तुम्ही संघर्षयात्रा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर काढण्याऐवजी तुमच्यावर होत असलेल्या पक्षांतर्गत अन्यायाच्या विरोधात यात्रा काढायला हवी होती. कारण, महाराष्ट्रातील युवकांना फसवण्याचे काम आपल्या माध्यमातून होत आहे. आपण वेळोवेळी बदललेली भूमिका ही राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही आणणार.”असे ते पुढे म्हणाले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘युवा संघर्ष यात्रे’ची सुरुवात

आज मंगळवारी, (24 ऑक्टोबर) पासून ‘युवा संघर्ष यात्रे’ची सुरुवात झाली असून पुण्यातील लाल महालापासून यात्रेची सुरुवात झाली आहे. यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या पदयात्रेत विविध पुरस्कार प्राप्त खेळाडू, वकील, डॉक्टर, महिला, कामगार, विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा आणि सामान्य नागरिकही प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हे ही वाचा 

गोपीचंद पडळकर स्वत:च्याच सरकारवर नाराज, उपोषणाची केली घोषणा

निलेश राणेंनी एवढा मोठा निर्णय का घेतला?

बेवडे वाढवण्याचे धोरण, गल्ला भरण्यासाठी सरकारची समिती

युवा संघर्ष यात्रेतील युवांच्या प्रमुख मागण्या

  •  शासकीय पदभरती व रोजगार
  1. कंत्राटी नोकरभरती रद्द करणे.
  2. २ लाख ५० हजार रिक्त पदांची भरती करणे.
  3. अवाजवी परीक्षा शुल्काच्या माध्यमातून होणारी वसुली थांबविणे तसेच यापूर्वी वसूल केलेले अतिरिक्त परीक्षा शुल्क परत करणे.
  4. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करणे तसेच नोकरभरतीत होणारा भष्टाचार रोखणे.
    रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात.
  5. शिक्षक व प्राध्यापकांसह इतर सर्व विभागातील रिक्त पदे भरणे.
  • औद्योगिक विकास व गुंतवणूक
  1. राज्यातल्या युवा वर्गाला खाजगी क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी गुंतवणूक धोरण राबविणे.
  2. नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळणे.
  3. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती यांसारख्या Two Tier शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञाना (IT) क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आणणे.
  4. तालुका स्तरावर MIDC ची स्थापना करणे आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC चे सक्षमीकरण करणे.
  5. MSME क्षेत्राचे बळकटीकरण तसेच उद्योजकता वाढीस चालना देणे.

  • कृषी
  1. खतांच्या लिंकिंगला बंदी घालून शेतकऱ्यांना कृषीनिविष्ठा निवडीचे स्वातंत्र्य देण्यात यावे.
  2. दुबार पेरणी करूनही अपुऱ्या पावसामुळे यंदा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत यावी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फी माफीसह इतर सवलती लागू कराव्यात, पीक विम्याची अग्रिम भरपाई द्यावी.
  3. प्रयोगशील युवा शेतकन्यांसाठी विशेष योजना राबविणे.
  4. आत्महत्या रोखण्यासाठी केवळ कागदी कार्यक्रम न आखता आत्महत्यांचे मूळ शोधून आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबविणे.
  • शिक्षण व कौशल्य विकास
  1. शाळा दत्तक योजना रद्द करणे.
  2. समुह शाळा योजना रद्द करणे.
  3. सारथी, बार्टी, महाज्योती व TRTI संस्थाचे सक्षमीकरण करून या यापूर्वी वसूल केलेले अतिरिक्त परीक्षा शुल्क परत करणे.
  4. TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे.
  5. नोकरदार महिला व विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अद्ययावत वसतिगृहे बांधणे.
  • कायदा आणि सुव्यवस्था
  1. महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा करणे.
  2. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना राबविणे.
  3. ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवणे.
  • सामाजिक व क्रीडा
  1. जातीनिहाय जनगणना करणे.
  2. युवा आयोगाची स्थापना करणे.
  3. क्रीडा विभागाचे सक्षमीकरण करणे व होतकरू खेळाडूंना संधी देणे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी