राजकीय

कर्तव्यतत्पर आमदार मातेच्या तक्रारीची खुद्द आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल!

मुंबई येथे काल झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज (Saroj Ahire) त्यांच्या 5 वर्षाच्या बाळासह हजर होत्या. त्याप्रसंगी बाळाची प्रकृती ठीक नव्हती. प्रवासामुळे अथवा वातावरणामुळे बाळाला ताप आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विधीमंडळासारखे एवढे मोठे शासकीय भवन असूनही त्यांच्या बाळासाठी कोणतीच सुविधा नसल्याकाराने आमदार अहिरे यांना रडू कोसळले आणि त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच आमदार अहिरे यांनी हिरकणी कक्षाबद्दलच्या गैरसोयींवरती देखील प्रकाश टाकला. (Health Minister Tanaji Sawant took cognizance of the complaint of conscientious MLA Saroj Ahire)

हिरकणी कक्षाची झालेली अवस्था पाहता, पाच महिन्यांच्या बाळाला धुळीत कसे ठेवू? असा सवाल करीत आ.सरोज अहिरे यांना अश्रूंना अनावर झाले.

मागच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र, तो नावा पुरता आहे. बाकी त्यात कोणतीही सोय नाही. आज जर सरकारच्या वतीने कोणतीही सोय करण्यात आली नाही, तर अधिवेशनावर बहिष्कार टाकून पुन्हा नाशिकला निघून जाणार असल्याचे त्यांनी काल जाहीर केलं होतं. दरम्यान, घडलेल्या प्रसंगानंतर समाजमाध्यमांतून प्रशासनावर कडाडून टीका झाल्यानंतर सरकारला जाग आली. आमदार अहिरे यांच्यासाठी तात्काळ हिरकणी कक्षाची दखल घेण्यात आली आहे.

आमदार अहिरे यांची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कानावर जाताच त्यांनी अहिरे यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधला व त्यांना येत्या २४ तासांच्या आत आया, नर्स, डॉक्टर सह सुसज्ज असा हिरकणी कक्ष तयार असेल याची ग्वाही दिली. एक लोकप्रतिनिधी म्हणून सरोजताई अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान एक आई म्हणून होणाऱ्या असुविधेबद्दल त्यांनी तक्रार करणे हे क्रमप्राप्त आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आपल्या मतदारसंघाप्रती कर्तव्यदक्ष भूमिका बजावण्यासाठी अधिवेशनात आलेल्या आमदार अहिरे यांच्या बद्दल आदर व्यक्त करून मंत्री सावंत यांनी तत्काळ दखल घेत संवेदनशिलता दाखविली आहे. आमदार अहिरे व चिमुकल्या बाळाला कुठल्याही असुविधेला तोंड द्यावे लागणार नाही, या संदर्भातील सूचना देखील मंत्री सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन 2022च्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मी आमदार आहे. पण त्याचबरोबर मी एक आईसुद्धा आहे, आणि ही दोन्ही कर्तव्य महत्वाची आहेत, असं अहिरे यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. मात्र हा प्रश्न फक्त विधीमंडळापुरता उपस्थित राहिलेला नसून महाराष्ट्रातील तमाम मातांसाठी आहे ज्यांना काही कारणास्तव स्वतःचे तान्हुले बाळ कार्यालयात घेऊन जावे लागते. आमदार अहिरे यांच्यामार्फत शासनदरबारी आलेल्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि हिरकणी कक्षाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून राज्यस्तरावर हालचाली करण्याची माफक अपेक्षा जनसामान्यांतून होत आहे.

हे सुद्धा वाचा: विधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार आईला रडू कोसळले…

धक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व फुटीर आमदार अपात्र ठरणार?

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

39 mins ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

1 hour ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

1 hour ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

2 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

2 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

6 hours ago