36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईविधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार आईला रडू कोसळले...

विधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार आईला रडू कोसळले…

आज 5 महिन्यांच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे यांनी मुंबई अधिवेशनाला हजेरी लावली आहे. मात्र बाळाची प्रकृती ठीक नसल्याने आणि विधानभवनात होणाऱ्या असंख्य गैरसोयींमुळे आमदार अहिरे यांना रडू कोसळले. दरम्यान याविषयी वारंवार याचना करूनही काही विशेष तरतुदी न केल्यामुळे आमदार अहिरे यांनी शासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

गतवर्षी 2022 मध्ये झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या दीड महिन्याच्या बाळाला घेऊन येणाऱ्या महिला आमदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघाच्या सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी लावली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा झाली होती. मी आमदार आहे. पण त्याचबरोबर मी एक आईसुद्धा आहे, आणि ही दोन्ही कर्तव्य महत्वाची आहेत, त्यामुळे मी माझ्या बाळाला इथे घेऊन आले असल्याचं सरोज अहिरे यांनी सांगितलं होत. बाळ अगदीच लहान आहे, माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे बाळाला घेऊन यावं लागलं असं सरोज अहिरे यांनी सांगितलं होतं.

आमदार सरोज अहिरे यांच बाळ आज 5 महिन्यांच झालं आहे, आणि आज पुन्हा त्यांच्या कर्तव्याची जाण ठेवत त्यांनी नागपूर अधिवेशनाला बाळासोबत हजेरी लावली आहे. मात्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या हिरकणी कक्षेत कसलीच सोय नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय कार्यालयात आपल्या तान्ह्या मुलाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागल्याचे ते म्हणतात. कक्षेत धूळ-माती पडली आहे कुठेही स्वच्छता नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शासनाकडे याविषयी वारंवार मागणी करूनही अजूनही बाळसाठी काही विशेष व्यवस्था देखील करण्यात आली नाही. त्यामुळे आमदार सरोज अहिरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

त्याचप्रमाणे, आज बाळाची प्रकृती ठीक नसल्याने आणि विधानभवनातील गैरसोयींमुळे आमदार अहिरे यांना रडू कोसळले. मागच्या अधिवेशनात त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र, तो नावा पुरता आहे. बाकी त्यात कोणतीही सोय नाही. आज जर सरकारच्या वतीने कोणतीही सोय करण्यात आली नाही, तर आपण उद्यापासून अधिवेशनावर बहिष्कार टाकून पुन्हा नाशिकला निघून जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हिरकणी कक्ष फक्त नावालाच!
तान्हुल्या बाळांना स्तनपान करता यावे, या हेतूने मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या हिरकणी कक्षाबाबत शासनाची उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ या पार्श्वभूमीवर हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच, असे प्रातिनिधिक चित्र राज्यभर आहे. हिरकणी कक्षात जाण्यास माता बिचकतात. कक्षात अस्वच्छता आणि अडगळ असल्याचे ठिकठिकाणी दिसते आणि या परिस्थितीत हिरकणी कक्ष बंद आणि रिकामेच राहत आहेत. शिवाय या सुविधेची उद्घोषणाही केली जात नसल्याचे आढळून आले आहे. हिरकणी कक्षाबद्दल मातांमध्ये उदासीनता आहे. त्यामुळे हिरकणी सुविधेबद्दल महामंडळाला आणखी जागरूकता करावी लागणार असून, हिरकणी कक्ष कुलूपबंद न ठेवता सहज उपलब्ध होतील, अशी योजना आखावी लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा :

शिंदे सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून, फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प!

कौतुकास्पद: बाळंतपणाच्या वेदनादायक प्रक्रियेतून जावूनही ‘ती’ने दिली बोर्डाची परीक्षा!

नात्याला काळिमा : नराधम आईनेच पोटच्या मुलींना फेकले देहविक्रीच्या जाळ्यात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी