राजकीय

हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

टीम लय भारी

मुंबई : उत्तराखंडी भाषा संमेलनाच्या माध्यमातून राजभवन मुंबई येथे ‘उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा’ या विषयावर एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. हिंदी भाषिक लोक केवळ आपली प्रादेशिक असलेली हिंदी भाषा बोलतात, परंतु महाराष्ट्रातील लोक मराठी शिवाय हिंदी भाषा देखील उत्तम बोलतात. अनेकदा महाराष्ट्र व गुजरात मधील लोक मूळ हिंदी भाषिक लोकांपेक्षा अधिक चांगली हिंदी बोलतात. हा बहुभाषिकतेचा गुण आपण घेतला पाहिजे अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केली. (Hindi speaking people should take the virtue of multilingualism from Maharashtra: Bhagat Singh Koshyari)

एखादी भाषा केवळ लिहून – वाचून येत नाही. तर भाषा ऐकून, व्यवहारात आणून व बोलून चांगली आत्मसात होते असे सांगताना उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊँनी व इतर भाषा बोलल्या पाहिजे, मुलांना शिकविल्या पाहिजे, आपापसात आपल्या भाषेत बोलले पाहिजे तसेच आपल्या भाषेत लघुपट, माहितीपट, व सिनेमांची निर्मिती केली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. भाषा प्रसारासाठी मिशन मोडवरच काम केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आपण कुमाऊं प्रदेशात जातो त्यावेळी लोकांशी कुमाऊँनी भाषेतच बोलतो असे सांगताना कुमाऊंनी – गढ़वाली भाषांमध्ये विपुल साहित्य आहे, एकापेक्षा एक सरस वाक्प्रचार व म्हणी आहेत; हिंदी सिनेमामुळे जसा हिंदी भाषेचा प्रचार प्रसार झाला तसा कुमाऊँनी – गढवाली  या भाषांचा प्रसार त्या भाषेतील लोकगीतांमधून होतो, असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण सर्व विद्यापीठांना दीक्षांत समारोहाचे संचालन इंग्रजीतून न करता मराठी भाषेतून करण्याचा आग्रह धरला व आज सर्व विद्यापीठे आवर्जून मराठी भाषेतून सूत्र संचलन व भाषणे करतात असे राज्यपालांनी सांगितले.

छत्तीसगह, झारखंड या नव्याने निर्माण झालेल्या राज्यांना देखील स्वतःची भाषा आहे, परंतु उत्तराखंडला स्वतःची सामायिक भाषा नाही. उत्तराखंड येथे गढवाली – कुमाऊँनी यांसह १४ बोलीभाषा आहेत. या दृष्टीने राज्याची एक प्रातिनिधिक सामायिक भाषा विकसित झाली पाहिजे असे मत साहित्यिक डॉ राजेश्वर उनियाल यांनी मांडले.

भाषा राजाश्रयानेच वाढते त्यामुळे शासनाने उत्तराखंडच्या भाषांना प्रोत्साहन द्यावे व त्यादृष्टीने समितीचे गठन करावे असे मत ज्येष्ठ साहित्यिक व भाषाविद डॉ बिहारीलाल जलंधरी यांनी व्यक्त केले. उत्तराखंड राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील अनेक शब्द मिळते जुळते आहेत. त्यामुळे सर्व भाषांना संगठीत करून उत्तराखंडी भाषा बनवावी अशी अपेक्षा डॉ अशा रावत यांनी व्यक्त केली.

गढवाली – कुमाऊंनी या भाषा हिंदीपेक्षा अधिक जुन्या आहेत असे सांगून मूळ भाषांचे अस्तित्व टिकावे अशी अपेक्षा नीलांबर पांडे यांनी व्यक्त केली. चर्चासत्राला ज्येष्ठ पत्रकार गणेश पाठक, मुख्य आयोजक चामू सिंह राणा व सूत्रसंचालक संजय बलोदी ‘प्रखर’ प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते डॉ बिहारीलाल जलंधरी यांनी लिहिलेल्या ‘उत्तराखंड की जनश्रुतियां’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


हे सुद्धा वाचा :

 

शिक्षकांच्या प्रशिक्षणात शिक्षण विभाग फेल, तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण स्थगित

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार : धनंजय मुंडे

‘पुण्यश्लोक मातेचा उल्लेख महाराणी अथवा राजमाता करु नका असे सुचविले तर एवढ्या मिरच्या लागायचे कारण काय ?’

‘सोनियाजी व राहुलजी गांधींना खोट्या केसमध्ये गोवण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न’

 

Pratiksha Pawar

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

2 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

3 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

3 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

3 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

3 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

7 hours ago