राजकीय

‘रामावर प्रेम असेल तर सितामाईचं संरक्षण करा’

राज्यात आगामी निवडणुकांचा वेध घेता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. देशात संसदेत झालेल्या हल्ल्यामुळे विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आता राज्यामध्ये बलात्काराच्या आकड्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. देशामध्ये राज्याचा बलात्काराप्रकरणी चौथा क्रमांक लागला आहे. जर हे सरकार असंच टीकून राहिलं तर लवकरच बलात्काराबाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर येईल, यावेळी त्यांनी राम मंदिर आणि महालांच्या सुरक्षेबाबत सवाल केला आहे. एवढंच रामावर प्रेम आहे तर सितामाईचे संरक्षण करा असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे उडता पंजाब हा उडता महाराष्ट्र झालाय, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

बिहारची महाराष्ट्रासोबत तुलना

राज्याची सुव्यवस्था बिघडली आहे. आधी आपण बिहारबद्दल बोलायचो मात्र आता ती परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. घटना घडली तर गुन्हे दाखल करायचे नाही. गुन्हे दाखल केले तर कारवाई करायची नाही. तपास करायचा नाही. अशी परिस्थिती सध्या आहे. उडता पंजापप्रमाणे उडता महाराष्ट्र झाला. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला पळून जाण्यासाठी सांगतो अशी गुन्ह्यांची परिस्थिती आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा

‘दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून राम तुम्हाला पावणार’?

मुंबई इंडियन्सकडून फेक फॉलोअर्सचा वापर?

खासदारांना संसदीय समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही

देवेंद्र फडणवीस हे चुकीचा बजेट मांडतात. दुसरीकडे एक लाख कोटी पुरवणी मागण्या आहेत. आमदरांना काही कोट्यवधी रूपये काम दिले, निधी नाही नियोजन नाही जनतेची फसवणूक केली. सिंचन प्रलंबित योजना राज्यात अनेक ठिकाणी आहेत.  आमचं सरकार गेल्यापासून त्यांनी काहीही केलेलं नसल्याचं जयंत पाटील म्हणत आहेत. एक पक्ष फोडला त्यानंतर दुसराही पक्ष फोडला आता सर्वांना एकाच पक्षात घ्या, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

बीड येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणाबाबत जयंत पाटील म्हणाले की, ज्यावेळी जाळपोळ सुरू होती. त्यावेळी आम्ही एसपींना फोन लावला होता. मात्र यावेळी फोन बंद होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात त्यांचा उल्लेख असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

 

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

1 day ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago