राज्यात आगामी निवडणुकांचा वेध घेता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. देशात संसदेत झालेल्या हल्ल्यामुळे विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आता राज्यामध्ये बलात्काराच्या आकड्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. देशामध्ये राज्याचा बलात्काराप्रकरणी चौथा क्रमांक लागला आहे. जर हे सरकार असंच टीकून राहिलं तर लवकरच बलात्काराबाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर येईल, यावेळी त्यांनी राम मंदिर आणि महालांच्या सुरक्षेबाबत सवाल केला आहे. एवढंच रामावर प्रेम आहे तर सितामाईचे संरक्षण करा असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे उडता पंजाब हा उडता महाराष्ट्र झालाय, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
बिहारची महाराष्ट्रासोबत तुलना
राज्याची सुव्यवस्था बिघडली आहे. आधी आपण बिहारबद्दल बोलायचो मात्र आता ती परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. घटना घडली तर गुन्हे दाखल करायचे नाही. गुन्हे दाखल केले तर कारवाई करायची नाही. तपास करायचा नाही. अशी परिस्थिती सध्या आहे. उडता पंजापप्रमाणे उडता महाराष्ट्र झाला. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला पळून जाण्यासाठी सांगतो अशी गुन्ह्यांची परिस्थिती आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा
‘दिल्लीतील मंदिराचं स्मशान करून राम तुम्हाला पावणार’?
मुंबई इंडियन्सकडून फेक फॉलोअर्सचा वापर?
खासदारांना संसदीय समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही
देवेंद्र फडणवीस हे चुकीचा बजेट मांडतात. दुसरीकडे एक लाख कोटी पुरवणी मागण्या आहेत. आमदरांना काही कोट्यवधी रूपये काम दिले, निधी नाही नियोजन नाही जनतेची फसवणूक केली. सिंचन प्रलंबित योजना राज्यात अनेक ठिकाणी आहेत. आमचं सरकार गेल्यापासून त्यांनी काहीही केलेलं नसल्याचं जयंत पाटील म्हणत आहेत. एक पक्ष फोडला त्यानंतर दुसराही पक्ष फोडला आता सर्वांना एकाच पक्षात घ्या, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.