27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्सकडून फेक फॉलोअर्सचा वापर?

मुंबई इंडियन्सकडून फेक फॉलोअर्सचा वापर?

देशात आयपीएल २०२४ (IPL 2024) हंगाम यायाला काही महिन्यांचा अवधी बाकी आहे. हा हंगाम सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. यामुळे आता रोहित शर्माचे चाहते संतापले आहेत. त्याचप्रमाणे रोहितची जागा आता हार्दिक पांड्या घेणार आहे. यामुळे रोहितच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या (mumbai Indians) संघमालकांवर नाराजी दाखवली आहे. रोहितला कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागल्याने तासाभरात लाखो रोहित शर्मा (Rohit Sharma) चाहत्यांनी तसेच एका दिवसात १ मिलियन रोहित शर्मा चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम सोशल अकाऊंटला अनफॉलो केलं आहे. मात्र यावर आता फ्रेंचायझीची लाज राखण्यासाठी फ्रेंचायझीने फेक म्हणजेच खोटे फॉलोवर्स (Mumbai Indians Fake Followers) खरेदी करत असल्याची चर्चा आहे.

रोहित शर्माच्या कर्णधारपादाबाबत घेतलेल्या निर्णयावर अनेक चाहते नाराज आहेत. असंख्य चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचे इंस्टा अकाउंट अनफॉलो केलं आहे. अशातच आता मागील काही दिवसांमध्ये मटाच्या वृत्तानुसार २० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्सने अकाउंटला अनफॉलो केलं आहे. दरम्यान कमी होत असलेल्या फॉलोअर्सची चिंता आता मुंबई इंडियन्स संघाच्या संघमालकांना सतावत आहे. यामुळे आता सोशल मीडिया टीम बोट्सचा वापर करत असल्याचा दावा केला जात आहे.

हे ही वाचा

खासदारांना संसदीय समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही

‘लोकशाही बसली धाब्यावर’ अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सरकारला चांगलंच झापलं

मिचेल स्टार्क आयपीएल लिलावात एकच नंबर; पॅट कमिन्सलाही टाकलं मागे

नेटकऱ्यांनी मुंबईला फॉलो करणाऱ्या नव्या अकाउंटचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही अकाउंटला कोणताही डीपी नाही. शिवाय या अकाउंटचे फॉलोअर्स देखील फारसे नसल्याचे पाहायला मिळत आहे. असे एक नाही अनेक अकाउंट फेक असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिष्ठा जपण्यासाठी मुंबई वापरते फेक फॉलोअर्स

‘रोहितला पुन्हा कर्णधार करा’

रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधार करा असा दावा केला आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात येणार असल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. मात्र तो आल्यानंतर कर्णधार होईल अशा देखील चर्चा होत्या. ती चर्चा आता सत्यात उतरली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी