राजकीय

जितेंद्र आव्हाडांना कधीही अटक होणार ; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय उपद्रवमूल्य कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा षडयंत्र रचण्यात आली. मात्र, त्यात यश न आल्याने पुन्हा असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होण्याची शक्यता असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सूचित केले आहे. कोणत्याही क्षणी मला अटक होऊ शकते असे खळबळजनक वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे. (Jitendra Avhad will be arrested anytime ) ठाण्यातील विवियना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. यावेळी प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून विनयभंगाच्या आरोपात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला कधीही अटक होऊ शकते असा दावा केला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यावरून राजकर्त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे.

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील विवियना मॉलमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत राडा केला होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जमीन मंजूर केल्यानंतर ७२ तासांतच त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मला कधीही अटक होऊ शकते, असे विधान केले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड यांच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात कधी कोणी सत्तेत, तर कधी सत्तेबाहेर विरोधी पक्षात असतात. राजकीय द्वेषातून कधी कोणीच त्रास देऊ नये. आमचं सरकार असताना काही लोकांना अडकवण्याचा आम्ही प्रयत्न केला, असे आताचे सत्ताधारी म्हणत आहेत.” पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.

अजित पवारांचा विरोधकांना इशारा
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. मागील ३०-३२ वर्षे मी राजकीय क्षेत्रात काम करत आहे. पण सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला नाही.कायदा, नियम आणि संविधान सर्वांनाच समान आहे. कायदा आणि घटनेचा विचार करून सर्वांनी पुढं गेलं पाहिजे.

हे सुद्धा वाचा

तरुणीला विवस्त्र करून विडिओ केला व्हायरल ; पुण्यातील घटना

मंत्र्यांचे चोचले पुरविण्यासाठी होणार १००० कोटींची उधळपट्टी !

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक मांडणार अंदाजपत्रक

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

2 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

2 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

4 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

6 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

7 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

7 hours ago