राजकीय

जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत

टीम लय भारी

मुंबई: प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे आपले घर असावे असे स्वप्न असते. तेच स्वप्न राज्य सरकार साकार करत आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 205 सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड सांगितले आहे (Jitendra Awhad gave the good news for the common man).

आज गुरुवार (ता.5) मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सोडतची जाहिरात 23 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून 14 ऑक्टोबर 2021 रोजी सोडत काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

सरकारी प्रताप, खोट्या स्वाक्षऱ्या करून हडपला निधी

सोडतीमध्ये समाविष्ठ एकूण सदनिकांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 70 टक्क, अल्प उत्पन्न गटासाठी 27 टक्के म्हणजेच 97 अत्यल्प व अल्प गटासाठी घरे उपलब्ध होतील.अर्जाची किंमत 560 रुपये असेल. अर्जासमवेत भरावयाची अनामत रक्कम अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार रुपये,अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी 15 हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार रुपये इतकी असेल. प्रवर्ग निहाय उत्पन्न मर्यादा मासिक अत्यल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार रुपये पर्यंत,अल्प उत्पन्न गटासाठी 25 ते 50 हजार रुपये पर्यंत, मध्यम उत्पन्न गटासाठी 50 हजार ते 75 हजार रुपये पर्यंत तर उच्च उत्पन्न गटासाठी 75 हजार रुपये पेक्षा जास्त अशी असेल (Jitendra Awhad said the category wise income limit is up to Rs 25,000 per month for the lowest income group).

संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत असून त्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सोडतीमध्ये अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने परतावा करण्यात येईल.

डॉ.जितेंद्र आव्हाड

मंत्री दत्तात्रय भरणेंची जादू, MPSC च्या फाईलवर राज्यपालांची दोन तासांतच स्वाक्षरी

Thane: Jitendra Awhad urges TMC chief to conduct audit for illegal buildings

ठाणे,पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरे

या योजनेतून उपलब्ध होणारी घरे ही ठाणे जिल्हयातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मिरारोड येथे, पालघर जिल्ह्यातील विरार बोळींज व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहेत.

म्हाडाच्या विभागीय मंडळातर्फे 10 हजार घरांची निर्मिती करणार

राज्यातील एकंदर घरांची मागणी लक्षात घेता तसेच पुणे येथील सोडतीचे यश पाहून म्हाडातर्फे आगामी काळात नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद अशा विभागीय शहरांमध्ये 10 हजार घरांची निर्मिती करण्यात येईल व ही घरे दर्जेदार असतील अशी माहितीही आव्हाड यांनी दिली (Jitendra Awhad said 10,000 houses will be constructed and these houses will be of good quality).

म्हाडा

राज्यातील जनतेला केंद्रीय योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न

राज्यातील जनतेला जास्तीत जास्त घरे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने,त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी लवकरच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह नवी दिल्लीत केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे व येत्या 3 वर्षात वरळी बीडीडी चाळीचे चित्र बदललेले असेल असा विश्वासही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.यावेळी म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन उपस्थित होते (Jitendra Awhad said that the picture of Worli BDD Chali will change in 3 years).

Sagar Gaikwad

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

3 mins ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

27 mins ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

2 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

5 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

6 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

8 hours ago