31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयमंत्री दत्तात्रय भरणेंची जादू, MPSC च्या फाईलवर राज्यपालांची दोन तासांतच स्वाक्षरी

मंत्री दत्तात्रय भरणेंची जादू, MPSC च्या फाईलवर राज्यपालांची दोन तासांतच स्वाक्षरी

टीम लय भारी

मुंबई: राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे एमपीएससी सदस्यांच्या नियुक्तीची यादी मागील आठवड्यात पाठवली होती. मात्र त्यावर राज्यपाल मुद्दाम निर्णय घेण्यात उशीर करत आहेत असा आरोप राज्य सरकरने केला होता. राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बुधवारी (ता. 4) सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांची याबाबत भेट घेऊन आयोगातील रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे, असे पटवून दिले. यानंतर राज्यपालांनी अवघ्या दोन तासांत एमपीएससी सदस्यांच्या नियुक्ती फाईलवर स्वाक्षरी केल्याने भरणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे (Dattatreya Bharane efforts have been successful MPSC file signed by governor within two hours).

दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी सायंकाळी राज्यपालांची राजभवनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी एमपीएससी सदस्यांच्या नियुक्ती होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांना पटवून दिले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी उमेदवारांची भरती प्रक्रिया रखडली आहे. कोरोना काळात रोजगारांसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जे विद्यार्थ्यी, उमेदवार एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांची मुलाखतीअभावी भरती रखडली आहे. राज्य सरकार तातडीने १५ हजार ५११ पदे भरणार आहे. ही पदे भरण्यासाठी उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. या मुलाखत प्रक्रियेला वेग येण्यासाठी आयोगातील रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्यामुळे एमपीएससीच्या सदस्यांच्या नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती मंत्री भरणे यांनी राज्यपालांकडे केली. भरणेंच्या विनंतीनंतर राज्यपाल कोश्यारी यांनी बुधवारी रात्री उशिरा फाईलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे भरणेंच्या शिष्टाईला यश आल्याचे म्हणता येईल.

अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खोडसाळपणा, राष्ट्रवादीने फटकारले

एमपीएससीच्या रिक्त जागा भरण्यासाठी सदस्यांची नियुक्तीचा विषय तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे. भरती होत नसल्याने उमेदवारांत नैराश्य आहे. त्यामुळे हा विषय तत्काळ मार्गी लावावा अशी विनंती राज्यपाल महोदयांना केली. त्यांनी विद्यार्थ्यांचा विषय गांभीर्याने घेत तातडीने फाईलवर स्वाक्षरी करणार असल्याचे सांगितले. राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे सरकारसोबतच विद्यार्थी- उमेदवारांच्यावतीने आभार मानतो, असे भरणे म्हणाले (Dattatreya Bharane said there is frustration among candidates as recruitment is not taking place).

Dattatreya Bharane efforts have been successful
दत्तात्रय भरणे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

राजभवनाने स्पष्टीकरण दिले

एमपीएससीच्या रिक्त ४ सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारने मागील आठवड्यात राज्यपालांकडे ७ नावांची यादी मंजूरीसाठी पाठविण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसापूर्वीच सदस्यांच्या नियुक्तीची फाईल राज्यपालांकडे पाठवून सुद्धा, राज्यपाल त्यावर मुद्दाम निर्णय घेत नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्यावर राजभवनाने स्पष्टीकरण देत संबंधित फाईल सोमवारी (ता.२) राजभवनात पोहचल्याचे सांगितले.

Dattatreya Bharane efforts have been successful
दत्तात्रय भरणे

MPSC ची परीक्षा २१ मार्चला होणार!

Maharashtra MPSC Subordinate services Prelims 2020 Revised Date OUT @mpsc.gov.in, Admit Cards Soon

राज्यपालांनी कोणत्या नावाला हिरवा कंदील दिला?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एमपीएससी सदस्यांच्या नियुक्ती फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानंतर राजभवनातून मुख्यमंत्री कार्यालयात फाईलवर स्वाक्षरी झाल्याचे सांगत फाईल घेण्यास सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी राजभवनात जाऊन फाईल घेतली. मात्र, राज्यपालांनी कोणत्या नावाला हिरवा कंदील दाखविला हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. राज्य सरकारने सेवानिवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव आणि निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांची नावे दिली आहेत.

सध्या एमपीएससीद्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदाची संख्या जवळपास २० हजारांच्या घरात आहे. साडेपंधरा हजार भरण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे, तर उर्वरित रिक्त पदेही सरकार येत्या काळात भरणार आहे. सध्या पाच सदस्य आणि एक अध्यक्ष असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्वरुप आहे. त्यामुळे आयोगावर कामाचा ताण पडू नये म्हणून आयोगावरील सदस्यांची संख्या वाढविण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. एमपीएमसीचा कारभार गतिमान व्हावा आणि उमेदवारांच्या मुलाखतीला विलंब लागू नये यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर आयोगावरील सदस्यांची संख्या ६ वरून १३ पर्यंत करण्याचा विचार आहे. याबाबत राज्यपालांशी चर्चा झाली असून, त्यांनी सदस्य संख्या वाढविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुढील एक- दोन महिन्यात याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार आणेल, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली .
-दत्तात्रय भरणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी