राजकीय

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा गंभीर आरोप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील पवार घराणेशाहीला आव्हान देण्यासाठी, भाजपची पकड आणखी मजबूत करण्यासाठी त्या बारामती, पुणे दौरा करण्यात सध्या व्यस्थ असल्याचे दिसून येत आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी गाठीभेटी करत भाजप कार्यकर्त्यांना बळ देण्याचे त्या काम करीत आहेत, तर त्याचवेळी त्या विरोधकांना धारेवर धरत त्यांच्यावर आरोपांचा भडीमार करीत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. पुण्यातील माध्यमांशी बोलताना निर्मला सितारामन यांनी थेट मविआ सरकारवर यांच्यावर हल्लाबोल करीत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या त्यांच्या विरोधावर टीका करत केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात येऊ का दिले नाही? असा सवाल त्यांनी शिवसेनेसोबतच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा केला आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय गोंधळ आणि विरोधी गटाचा भाजपवरील आक्षेप यावर बोलताना त्यांनी थेट शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्यावरच निशाणा साधला. यावेळी बोलताना सितारामन म्हणाल्या, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधक रडत आहे. पण त्यांनी आधी याचं उत्तर द्यावं की केंद्रातील चार मोठे प्रकल्प राज्यात येऊ का दिले नाही? असा सवाल करीत निर्मला सितारामन यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत.

हे सुद्धा वाचा…

Auto-Rickshaw and Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा भाडे महागले

PFI Activist Arrest: विद्येच्या माहेरघरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा! व्हिडिओ व्हायरल

Ashish Shelar : अशिष शेलार म्हणाले, तो राजहंस एक…….

राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिवसेंदिवस कळीचा मुद्दा बनत चाललेल्या या विषयावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर अक्षरशः तुटून पडत आहेत. हाच मुद्दा पुन्हा उपस्थित करत निर्मला सितारामन यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना फटकारले आहे. निर्मला सितारामन म्हणतात, नाणार सारखा प्रकल्प, जी आशियामधील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती, त्याला कोणी रोखलं? तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्प होऊ दिला नाही. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला? सर्वांना माहित आहे. हा प्रकल्प झाला असता तर याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणार होतं म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे, असे म्हणून भाजपची नेमकी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

निर्मला सितारामन पुढे म्हणतात, राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आज इतका आरडाओरडा करत आहे. पण देशातील प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले? याचे उत्तर महाविकास आघाडीने द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावा, असे म्हणत जोरदार हल्लाबोल करीत विरोधकांवर टीका केली आहे. दरम्यान, सहकार क्षेत्रात अनेकांनी आपली राजकीय पोळी शेकली, पण त्यापैकी कोणीही वेगळं मंत्रालय बनवण्यासाठी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवलं. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे. सहकार क्षेत्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असे सुद्धा सितारामन यांनी यावेळी सांगितले.

खरंतर निर्मला सितारामन यांच्या बारामती, पुणे दौऱ्याने आधीच उलट – सूलट चर्चा सुरू असताना सितारामन यांनी राज्याच्या राजकारणात सुद्धा उडी घेतल्याने विरोधीगटातून तीव्र पडसाद उमटत आहे. सध्या तु तु मैं मैं च्या नादात राज्यातील इतर समस्यांकडे राज्यसरकारचे सपशेल दुर्लक्ष होत आहे त्याकडे कधी लक्ष देणार म्हणून जनसामान्यांमधून एक वेगळाच सूर ऐकायला मिळत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

2 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

3 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

3 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

3 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

4 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

7 hours ago