27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमुंबईAuto-Rickshaw and Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा भाडे महागले

Auto-Rickshaw and Taxi Fare Hike: मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा भाडे महागले

देशभरात सध्या सामान्य नागरिक महागाईने त्रस्त असल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईकरांना आणखी एक झटका बसणार असल्याची माहितची समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोमधून प्रवास करणे महाग होणार आहे. राज्य परिवहन विभागाने 1 ऑक्टोबरपासून टॅक्सींचे किमान भाडे 3 रुपये आणि ऑटो-रिक्षाचे किमान भाडे 2 रुपयांनी वाढवण्याचे मान्य केले आहे.

देशभरात सध्या सामान्य नागरिक महागाईने त्रस्त असल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईकरांना आणखी एक झटका बसणार असल्याची माहितची समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोमधून प्रवास करणे महाग होणार आहे. राज्य परिवहन विभागाने 1 ऑक्टोबरपासून टॅक्सींचे किमान भाडे 3 रुपये आणि ऑटो-रिक्षाचे किमान भाडे 2 रुपयांनी वाढवण्याचे मान्य केले आहे. टॅक्सी कॅबचे सध्याचे किमान भाडे 25 रुपये आहे तर ऑटो रिक्षांचे किमान भाडे 2 रुपये आहे. 21 रुपये आहे. त्याच वेळी, भाडे वाढल्यानंतर, टॅक्सी आणि ऑटोसाठी नवीन किमान भाडे अनुक्रमे 28 रुपये आणि 23 रुपये असेल.

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे (MTU) नेते अँथनी क्वाड्रोस यांनी सांगितले आहे की, “राज्य सरकारने शुक्रवारी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (MMRTA) च्या मंजुरीनंतर टॅक्सी आणि ऑटो-रिक्षाच्या भाड्यात सुधारणा करण्याचे मान्य केले.” बैठकीला उपस्थित असलेले मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन म्हणाले की, “परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमएमआरटीएने सोमवारी या निर्णयाला मान्यता दिली जाईल आणि 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.”

परिवहन विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने या निर्णयाला दुजोरा दिलेला नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी कामगार संघटनांसोबत झालेल्या बैठकीत भाडे सुधारण्यास सहमती दर्शविली आहे. त्याचवेळी, बुधवारी एमटीयूने 26 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता. मात्र युनियनने आता संप मागे घेतला आहे.

हे सुद्धा वाचा –

PFI Activist Arrest: विद्येच्या माहेरघरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा! व्हिडिओ व्हायरल

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना खेळायचीय 20-20 मॅच…

India T-20 World Cup Win : भारताच्या टी-20 विश्वचषक विजयाला 15 वर्षे पूर्ण!

दरम्यान, यापूर्वी मार्च 2021 मध्ये रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी टॅक्सीचे किमान भाडे 22रुपयांवरून 25 रुपये तर रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आले होते. सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 60 हजार टॅक्सी आणि जवळपास 5 लाख रिक्षा आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणार पॅट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे रिक्षा अन् टॅक्सीचालकांनी भाडेवाढीसाठी संप पुकारला होता. त्यानंतर आता भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे सामान्य नागरिकांमध्ये मात्र, चिंता वाढल्याचे दिसत आहे. अनेकांना रोजच्या जीवनात दळणवळणासाठी प्रामुख्याने रिक्षा-टॅक्सीचा वापर करावा लागतो. आता या प्रवासी साधनात झालेली वाढ लक्षात घेता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी