राजकीय

अपघात की घातपात? ममता बॅनर्जींच्या डोक्याला तीन टाके, डॉक्टरांचा खळबळजनक दावा

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचे जखमी अवस्थेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पश्चिम बंगालसह देशभरात चांगलीच खळबळ माजली. त्यानंतर ताक्ताळ ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना शासकीय एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्या कपाळावर टाके मारले आणि उपचार करून घरी पाठवले. मात्र, अपघात की घातपात? असं अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. अशातच डॉक्टरांनी खळबळजक दावा केला आहे.

एकीकडे देशात लोकसभा निवडणुकी(Loksabha election) धावपळ सुरु आहे तर दुसरीकडे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना दुखापत त्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मागून ढकलल्यामुळे ममता बॅनर्जी घरात पडल्या आहेत. असं वक्तव्य केलं आहे. तर त्यांच्या वहिनीने कटाचा संशय व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या होण्याची शक्यता

नेमकं काय म्हणाले बंदोपाध्याय ?

आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, मागून ढकलल्यामुळे त्या घरात पडल्या आहेत. त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कपाळ आणि नाकावर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. ते म्हणाले की, “रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी ममता बॅनर्जींची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, सर्व आवश्यक तपासण्या करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचेही बंदोपाध्याय म्हणाले.

तसेच, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या भावानेही या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. ते घटनास्थळी नव्हते पण या घटनेवेळी त्यांच्या पत्नी घरीच होत्या त्यांनी हा प्रकार सांगितला. ममता बॅनर्जी यांची वहिनी आणि तृणमूलच्या नगरसेविका कजरी बॅनर्जी यांनी या घटनेला कट असल्याचा दावा केला आहे.

Electoral bonds: सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक चाबूक, SBI ला दिल्या नव्या सूचना

या घटनेची चौकशी पोलिस करत आहेत. अधिकाऱ्यांचे पथक आज मुख्यमंत्र्यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असून, अशा परिस्थितीत त्यांना बेडरूममध्ये मागून कसे ढकलले गेले, याचा तपास केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममध्ये येणाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे.

ममता बॅनर्जी यांना यापूर्वी अनेकदा अपघातांना आणि दुखापतींना सामोरं जावं लागलं आहे. 2021 मध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर काही महिने उपचार सुरु होते. हा अपघात झाला तेव्हा पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होत्या. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथील आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात त्यांना अपघात झाला होता. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

Electoral bonds : तब्बल 1,386 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणारा सँटियागो मार्टिन आहे तरी कोण?

त्यानंतर ममता बॅनर्जी यांना 2023 मध्येही अपघात झाला होता. हा अपघात सिलीगुडी येथे झाला होता. त्यांच्या हॅलिकॉप्टरची एमरजन्सी लँडिग करावी लागली होती. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. शिवाय डाव्या गुडघ्याला आणि पाठीलाही काही जखमा झाल्या होत्या.

धनश्री ओतारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

8 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

9 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

9 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

10 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

11 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

12 hours ago