29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयलोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकसंदर्भात (Loksabha Election 2024) मोठी अपडेट दिली आहे. सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या(General Elections 2024 ) विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. ही माहिती निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर जाहिर केली आहे. तसेच ही पत्रकार परिषद ECI च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाईल. यासोबतच उद्यापासून आचारसंहिता लागू होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकांच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. ही बैठक जवळपास 45 मिनिटे सुरू होती. या बैठकीत 16 मार्च रोजी निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्याचं निश्चित झालं असल्यांचं बोललं जात आहे. तसेच, 2024 साठी होणारी ही लोकसभा निवडणूक 7 ते 7 टप्प्यांमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने 8 फेब्रुवारी रोजी, सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल प्रसिद्ध केला होता. आयोगाने सांगितले की, 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदार मतदानात सामील झाले आहेत. यादी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6 टक्के वाढ झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक चाबूक, SBI ला दिल्या नव्या सूचना

निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. याशिवाय, लिंग गुणोत्तर देखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे.

Electoral bonds : तब्बल 1,386 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणारा सँटियागो मार्टिन आहे तरी कोण?

लोकसभा निवडणूक 2024 साठी देशभरात एकूण 97 कोटी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने 8 फेब्रुवारी रोजी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील मतदारांच्या संदर्भात स्पेशल समरी रिवीजन 2024 रिपोर्ट प्रसिद्ध केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी