31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयElectoral bonds :निवडणूक रोख्यांचे पत्ते उघड, तब्बल 1386 कोटींचा खरेदीवीर सँटियागो मार्टीन...

Electoral bonds :निवडणूक रोख्यांचे पत्ते उघड, तब्बल 1386 कोटींचा खरेदीवीर सँटियागो मार्टीन आहे तरी कोण ?

निवडणुक आयोगाने नुकतंच म्हणजेच गुरुवारी इलेक्टोरल बाँड्सचा(Electoral bonds) डेटा सार्वजनिक केला. यामध्ये राजकीय पक्षांना आतापर्यंत या माध्यमातून किती पैसे प्राप्त झाले याबाबत यात माहिती दिली आहे. सोबतच कोणत्या कंपनीने किती रुपयांचे बाँड्स घेतले हेदेखील स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या माहितीदरम्यान चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस' या कंपनीची. या कंपनीने तब्बल 1,368 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले होते. 'फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस' या कंपनीच्या मालकाचे नाव सँटियागो मार्टिन (Santiago Martin) आहे. मार्टिन यांना देशात 'लॉटरी किंग' म्हणून ओळखले जातात.

निवडणुक आयोगाने नुकतंच म्हणजेच गुरुवारी इलेक्टोरल बाँड्सचा(Electoral bonds) डेटा सार्वजनिक केला. यामध्ये राजकीय पक्षांना आतापर्यंत या माध्यमातून किती पैसे प्राप्त झाले याबाबत यात माहिती दिली आहे. सोबतच कोणत्या कंपनीने किती रुपयांचे बाँड्स घेतले हेदेखील स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या माहितीदरम्यान चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस’ या कंपनीची. या कंपनीने तब्बल 1,368 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले होते. ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस’ या कंपनीच्या मालकाचे नाव सँटियागो मार्टिन (Santiago Martin) आहे. मार्टिन यांना देशात ‘लॉटरी किंग’ म्हणून ओळखले जातात.

निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, लॉटरी किंग मार्टिन सँटियागो(Santiago Martin) यांनी सर्वाधिक 1,368 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे या यादीतून समोर आले आहे. मार्टिनची कंपनी फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल्स सर्व्हिसेसने 21 ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2024 दरम्यान हे रोखे खरेदी केले आहेत.

तर जाणून घेऊयात सँटियागो मार्टिन यांच्याबद्दल….

मिळालेल्या माहितीनुसार, सँटियागो मार्टिन (Santiago Martin)यांचा प्रवास मजूर ते लॉटरी किंग असा आहे. मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मार्टिन म्यानमारच्या यंगून शहरात मजूर म्हणून काम करत असे. या पैशातून मार्टिन आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरत असे. नंतर ते भारतात परत आले आणि 1988 मध्ये त्यांनी तामिळनाडूमध्ये लॉटरीचा व्यवसाय सुरू केला.

Rarshtravadi congress;राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आठ उमेदवारांची यादी प्रसिद्ध

अवघ्या काही वर्षांमध्येच त्यांनी (Santiago Martin)हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र काही वर्षांमध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि म्यानमार मध्येही मार्टिन यांनी लॉटरी व्यवसाय सुरू केला. लॉटरी व्यवसायासोबत त्यांनी अनेक व्यवसायामध्ये उडी घेतली.

ajit pawar;अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवार यांचं नाव वापरण्याची बंदी

रिअल इस्टेट, कंस्ट्रक्शन, अल्टर्नेट एनर्जी, व्हिजुअल मीडिया एंटरटेन्मेंट, टेक्स्टाईल्स, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, एज्युकेशन, सॉफ्टवेअर, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट, अ‍ॅग्रो, ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि बिल्डिंग मटेरिअल्स अशा सर्व क्षेत्रांमध्ये मार्टिन कार्यरत आहेत. मार्टिन यांच्या वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार, मार्टिन हे सर्वाधिक कर भरणारी व्यक्ती आहेत. त्यांनी अब्जावधींचा कर भरल्याचं सांगण्यात आलं आहे.

मार्टिन ईडी-सीबीआयच्या रडारवर

फ्युचर गेमिंग कंपनी आणि मार्टिन हे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी संस्थांच्या रडारवर आहेत. 2007 सालापासूनच मार्टिन यांच्याविरोधात सीबीआय केसेस दाखल आहेत. 2015 साली त्यांच्यावर देशातील कित्येक राज्यांमध्ये लॉटरी स्कॅम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर 2019 साली त्यांच्यावर अशाच स्कॅममधून 910 कोटी लाटल्याचा आरोप केला होता.

मार्टिन यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये 2022 साली त्यांची सुमारे 500 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसंच, 2023 च्या मे महिन्यात देखील त्यांची 457 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी