राजकीय

२४ डिसेंबरनंतर महाराष्ट्रात काय घडणार?

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आत जास्त आक्रमक झाले आहेत. त्यांनी दुसरे उपोषणही मागे घेतले असले तरी ते सरकारच्या आश्वासनावर समाधानी नसल्याचे दिसत आहे. १ नोव्हेंबरला त्यांनी उपोषण मागे घेताना सरकारला २ जानेवारीची मुदत दिली होती. पण आता त्यांनी पुन्हा नवी तारीख दिली आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आता आरपारची लढाई छेडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय काहीही झाले तरी मराठा आरक्षण (maratha aarakshan) घेतल्याशिवाय सरकारचा पिच्छा सोडणार नाहीत, हेही यातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. कारण जरांगे-पाटील यांनी दिलेल्या डेडलाईनमध्ये आरक्षण मिळेल यांची शक्यता कुणालाही वाटत नाही.

२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळालेच पाहिजे, अन्यथा मराठ्यांनो एकत्र राहा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी अनेक आंदोलने झाली, शांततेच लाखोंचे मोर्चा काढण्यात आले. त्यातून सरकार हादरलेली, पण मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात केल्यानंतर आणि २ सप्टेंबरला पोलिसांनी उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर जरांगे-पाटील प्रकाशझोतात आले ते कायमचे.

या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरची नवी डेडलाईन (24 december deadline) सरकारला दिली आहे. वास्तविक त्यांनी २ जानेवारी ही तारीख देण्यापूर्वीही २४ डिसेंबर हीच डेडलाईन दिली होती. पण सरकारने राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढल्याचे जरांगे-पाटील यांना गेल्या आठवड्यात दाखवले. पण कुणबी नोंदीचे दाखले असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, असे या जीआरवरून दिसते, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले होते.

जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरल्या डेडलाईनचा आता पुनरुच्चार केला आहे. कोणीही आत्महत्या करू नका. हे शेवटचे आवाहन आहे असे म्हणत, जर सरकारने काही मागे-पुढे केले तर एकजूट दिसली पाहिजे त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे.

हे ही वाचा

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी पुन्हा महाराष्ट्र दौरा !

Lalit Patil Drugs Case | ललित पाटीलच्या संपत्तीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

रश्मिका मंदानानंतर सारा-शुभमनही ‘डीपफेक’चे बळी

दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेत्यांनीही महायुती सरकारवर तोंडसुख घेतले आहे. जरांगे-पाटील यांनी नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. सरकार हा इशारा गांभीर्याने घेणार का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर जरांगे-पाटील सरकारला शांतीच्या मार्गावर नेणार की क्रांतीच्या मार्गावर, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

3 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

3 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

3 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

3 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

3 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

3 days ago