महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी पुन्हा महाराष्ट्र दौरा !

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आता राज्यभर दौरा करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता 15 नोव्हेंबरपासून राज्यभर दौरा (Manoj Jarange Patil Maharashtra Tour) करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून 23 नोव्हेंबरला हा दौरा संपणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची गरज असून त्यामुळेच हा महाराष्ट्र दौरा करत असल्याचे सांगितले. हा दौरा 15 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबर पर्यंत सहा टप्यांमध्ये होणार आहे. जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यामुळे मराठा समाजाचे आरक्षणाविषयी प्रबोधन करण्यात येणार असून मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी धार प्राप्त होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे केलेल्या पहिल्या उपोषणानंतर त्यांनी राज्यभर दौरे घ्यायला सुरुवात केली होती. आता दुसऱ्या उपोषणानंतर ते पुन्हा एकदा राज्यभर दौरे काढणार आहेत. हा त्यांच्या दौऱ्यांचा तिसरा टप्पा असून 15 नोव्हेंबरपासून वाशी येथून ह्या दौऱ्याची सुरुवात होईल. तसेच या दौऱ्याचा शेवट 23 नोव्हेंबर रोजी शेवगाव येथे होणार आहे.

असा असेल महाराष्ट्र दौरा..

  • 15 नोव्हेंबर – वाशी, परांडा करमाळा
  • 16 नोव्हेंबर – दौंड, मायनी
  • 17 नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
  • 18 नोव्हेंबर – सातारा, वाई, रायगड
  • 19 नोव्हेंबर – रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी
  • 20 नोव्हेंबर – तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा
  • 21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर
  • 22 नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
  • 23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधगाव

मनोज जरांगे पाटील यानंतर अजून दौरे करणार असून यांची माहिती त्यांनी दिली. आपल्या पुढच्या टप्प्यातील दौऱ्यात विदर्भ, उर्वरित मराठवाडा, कोकण भाग असेल.

हे ही वाचा 

मराठा आरक्षणासंदर्भात निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन

भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच माणसांनी फोडले?

मराठा आरक्षणावरून आत्महत्येचं सत्र सुरूच

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आतापर्यंतचा प्रवास

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी (Antarwali Sarati) येथे मनोज जारांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आंदोलनस्थळी जेथे मंडप घातला होता तेथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज केला. या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त गेला होता. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण चालूच ठेवत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. त्यांच्या मागणीमूळे राज्य सरकार कोंडीत सापडले होते. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर 14 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून पाणी घेत उपोषण स्थगित केलं होतं. त्याचवेळी सरकारने त्यांच्याकडून एक महिन्याची मुदत घेतली होती. त्यात 10 दिवस जास्त देत जरांगे-पाटील यांनी 40 दिवसांची मुदत सरकारला दिली. पण त्या काळात सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकली नाही. मात्र, न्या. शिंदे यांची समिती नेमून कामाला सुरुवात केली होती. निजामाच्या काळातील दस्तावेज तपासण्याचे काम समितीने सुरू केले होते.

त्यानंतर पुन्हा जरांगे-पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणास सुरुवात केली. यावेळी, त्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करून उपोषण करण्याचा निर्णय घेतला. 9 दिवस उपोषण केल्यानंतर राज्य सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. राज्य सरकारने यावेळी जीआर काढत सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे, जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदत आणखी कमी करून 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे.

लय भारी

Recent Posts

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 mins ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

36 mins ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

2 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

2 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

3 hours ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

4 hours ago