34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमनोरंजनरश्मिका मंदानानंतर सारा-शुभमनही 'डीपफेक'चे बळी

रश्मिका मंदानानंतर सारा-शुभमनही ‘डीपफेक’चे बळी

गेल्या आठवड्यात पुष्पाफेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika Mandanna) एका व्हिडीओमुळे बरीच चर्चेत होती. तिच्या बिकिनीतील व्हिडीओमुळे बराच गोंधळ झाला. नंतर कळले की ती रश्मिका मंदाना नव्हती तर झारा पटेल होती. डीपफेकच्या (deepfake) तंत्रज्ञानामुळे हा चेहरेबदल केला होता. तसाच प्रकार आता क्रिकेटपटू शुबमन गिल (shubaman gill)आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (sara tendulkar) यांच्याबाबत घडली आहे. दोघांचा एकत्र म्हणजे अगदी खांद्यावर हात टाकलेला फोटो सध्या खूप व्हायरल होतोय. यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या फोटोतील सत्य बाहेर आले आहे. इथेही चेहऱ्यात बदल करून प्रतिमा डागाळण्या प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. वर्ल्डकप मालिकेतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यात शुबमनचे शतक हुकले तेव्हा सारा हळहळल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर शुबमन आणि साराचा हा फोटो व्हायरल झाल्यामुळे पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली होती. प्रत्यक्षात तो शुबमन नव्हता. मग शुबमनच्या जागी कोण होता? तर सारा आणि अर्जुन या भावंडाचा तो फोटो होता. ज्या प्रमाणे रश्मिका मंदानाचा व्हिडीओ व्हायरल झाला तसाच यांचाही फोटो व्हायरल करण्यात आला. प्रत्यक्षात अर्जुनच्या जागी शुबमनचा चेहरा मॉर्फ करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

गेल्या आठवड्यात रश्मिका मंदानाच्या व्हायरल व्हिडीओवरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी रश्मिकाला कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर रश्मिका मंदानाने अमिताभ बच्चन यांचे आभारदेखील मानले होते.

आता तसाच प्रकार क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या मुलीसोबत घडला आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा (sara tendulkar) हिला बसला आहे. सारा आणि शुबमन गिल (shubaman gill) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये साराने उजव्या हात शुबमनच्या गळ्यात घातला आहे. अनेक दिवसांपासून सारा-शुबमनच्या डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच हा फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला नवी फोडणी मिळाली आहे.

आता प्रश्न आहे की, अशा प्रकारांना आळा कसा घालायचा. रश्मिका मंदाना आणि सारा-शुबमन यांच्या व्हायरल फोटोमुळे सर्व समोर आले आहे. पण तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्यांना कसे आवरणार, हाच खरा प्रश्न आहे. याला आताच आवर न घातल्यास पुढे खरे काय नी खोटे काय, हे समजणेही अवघड जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी