राजकीय

MNS MLA Raju Patil : तुमचं सगळं ओक्के, जनतेच्या प्रश्नांचे काय ? मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावले

शिंदे-भाजप सरकारला येऊन आता एक महिना उलटून गेला आहे. तरी सुद्धा नव्या मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. तसेच आज-उद्या करता करता शिंदे सरकारकडून सध्या तरी सामान्य जनतेला मुर्खात काढण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय उलथापालथींमुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नाहीयेत. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून तारीख पे तारीख सुरु असल्याने सर्व स्तरांतून टिका होताना दिसत आहेत. त्यात आता फक्त विरोधकचं नाहीत तर सरकारच्या बाजूने असणारे मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला खरमरीत प्रश्न विचारला आहे.

“बंड झाले आता थंड झाले, पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालयं, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे, पण लोकांचे सण आलेत, रस्त्यांवरचे खड्डे, वाहतुकीची कोंडी, वाढलेली रोगराई यांकडे कोण बघेल?’ असं ट्विट करत राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

शिंदे गटाच्या बहुमत चाचणीमध्ये मनसेने शिंदे गटाला समर्थन दिले होते. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुकही केले होते. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर मनसेला राज्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद मिळणार अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु मंत्रीमंडळ विस्तारास होत चाललेल्या दिरंगाईमुळे मनसे आणि शिंदे सरकार मध्ये सार काही आलबेल नसल्याचं चित्र समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Cabinet : अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

Eknath Shinde : मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे यांचे पहिल्यांदाच मोठे विधान

Raju patil : आमदारांना मोफत घरे नकोत, त्याऐवजी जनतेला मोफत वीज द्या; मनसे आमदाराचा घरचा आहेर

शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन करुन महिना उलटला असला तरी अजून मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने अनेक नेत्यांचे जीव सध्या टांगणीला लागले आहेत. मनसेचे एकुलते एक आमदार असलेले राजू पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असताना त्यांनी केलेल्या ट्विटमुळे या दोन गटांमध्ये सगळं काही ठीक आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा सोशल मीडियावरून नव्या सरकारच्या लांबणीवर चाललेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची खिल्ली उडविण्यात येत आहे.

दिपाली कोकरे - शेंडगे

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

2 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

3 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

3 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

3 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

3 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

7 hours ago