33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeराजकीयRaj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार...

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

टीम लय भारी

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं तयारी केली आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्याचा दौरा केला होता. मात्र राज ठाकरेंनी तब्येत बिघडल्यामुळे काही काळ विश्रांती घेतली होती(Raj Thackeray will go on a tour of Nashik)

आता पुन्हा एकदा नाशिकपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. राज्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत. राज्यात मनसेला पुनरुज्जीवित करण्यासाठी राज ठाकरेंनी रणनीती आखली आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी देणार : राजेश टोपे

Raj Thackeray : राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन!

राज्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. मनसेकडूनही जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणार आहेत. मराठवाडा, औरंगाबाद आणि नाशिकसह पुण्याचा दौऱ्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संवाद आणि त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी आणि पदाधिकारी, शाखा अध्यक्षांची बैठक राज ठाकरे दौऱ्यादरम्यान घेतील.

राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सहा विभागांमध्ये आयोजित केला आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक असा दौरा असणार आहे. सोमवार, १३ डिसेंबर २०२१ रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. नाशिकमध्ये यापुर्वीही राज ठाकरे दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यात पक्षात मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आली तसेच नाशिकमधील निवडणुकीची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे.

Raj Thackeray : हाथरस येथील अमानुष घटनेनंतर राज ठाकरे गरजले, महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?

Raj Thackeray Hails Babasaheb Purandare As Chhatrapati Shivaji Maharaj’s ‘true Custodian’

राज ठाकरे नाशिकला रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. सकाळी १० वाजता नाशिक मध्यवर्ती कार्यलयात राज ठाकरे पोहचतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक दौऱ्यानंतर लगेच औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी