राजकीय

पंढरपूर, बालाजी तिर्थक्षेत्राप्रमाणे मुंबादेवीचाही विकास करणार : एकनाथ शिंदे

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर पंढरपूर, बालाजी तिर्थक्षेत्राप्रमाणे मुंबादेवी मंदिर परिसराचाही पुनर्विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबादेवी प्राचीन मंदिर असून, याप्रती सर्वांनाच श्रद्धा, आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर आणि परिसरात मोठ्या संख्येने भक्त येत असतात. श्री. काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर तसेच तिरूपती देवस्थानाच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. तसेच या परिसरात अत्यावश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन दर्शन रांगा, वाहनतळ आणि इतर आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, माजी मंत्री राज के. पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : 

नामवंत मराठी कलाकारांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

सावरकर गौरव यात्रा अन् राहुल गांधींचा निषेध – एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण…; राऊतांचे चिमटे

 

टीम लय भारी

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

1 hour ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

2 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

3 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

3 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

3 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

4 hours ago