राजकीय

भारतात महागाई, बेरोजगारीने प्रचंड हाल, मोदींचे मित्र मात्र मालामाल : नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची मागील ८ वर्षांतील कामगिरी सर्वच आघाडीवर शून्य राहिली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे, बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. तर मागील ८ वर्ष ही खाजगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल आणि जनतेचे प्रचंड हाल करणारी ठरली आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. (Nana Patole criticizes Narendra Modi over inflation)

मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारचा पायाच खोटेपणावर उभारलेला आहे. २०१४ साली वारेमाप आश्वासने देत सत्तेवर आले पण आतापर्यंत एकही आश्वासन हे सरकार पूर्ण करु शकले नाही. महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आश्वासन दिले पण प्रत्यक्षात महागाई दुपट्टीने वाढली. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ४५० रुपये होता तो आज एक हजारांपेक्षा जास्त महाग झाला आहे. पेट्रोल ६५ रुपये लिटर होते ते आज ११० रुपये लिटर झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही दुप्पट झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न सुद्धा स्वप्नच राहिले. सरकारी पदे रिक्त असूनही भरली जात नाहीत, रेल्वेतील ७२ हजार पदे संपुष्टात आणली आहेत. १.२५ कोटी महिलांनी रोजगार गमावले तर जवळपास ४ कोटी परुषांचे रोजगारही गेले.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील परकीय गुंतवणूक रोडावली असून ज्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली होती त्यांनीही गाशा गुंडाळला आहे. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे छोटे, मध्यम व लघु व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. कोरोनामुळे मोदी सरकारच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. आरोग्य सुविधांअभावी हजारो लोक तडफ़डून मेले. कोरोनाच्या भयंकर संकटाचा लोक सामना करत असताना मोदी सरकार मात्र मदत करण्याऐवजी टाळ्या, थाळ्या वाजवण्याचे भंपक आवाहन करत होते. गंगेच्या पात्रात हजारो मृतहेद तरंगत होते हे जगाने पाहिले पण मोदी सरकारला ते दिसले नाहीत. जनतेचे प्रचंड हाल झाले आणि जगभर भारताची नाच्चकी झाली.

आठ वर्षात मोदी सरकारने एकही नवीन रोजगार निर्मिती करणारा मोठा प्रकल्प उभा केला नाही मात्र ७० वर्षात काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या फायद्यातील सार्वजनिक कंपन्या मात्र मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात कवडीमोल भावाने घातल्या. या कंपन्यांचे खाजगीकरण करुन नोकऱ्या संपुष्टात आणल्या व तेथील आरक्षणही घालवले. देशातील २४ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्याखाली गेली. मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिले जात आहे, हे भूषणावह नाही तर गरिबांच्या वाढलेल्या संख्येचा परिणाम आहे.

आठ वर्षातील मोदी सरकारने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कारवाया केल्या. मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी मंदिर-मशिदी सारख्या धार्मिक मुद्द्यांना हवा दिली. धर्मा- धर्मात तेढ निर्माण केली. एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभे करून फोडा व राज्य करा या इंग्रजांप्रमाणे राज्यकारभार सुरु केला. सर्व संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे. मागील ८ वर्षात प्रगतीकडे वाटचाल करण्याऐवजी भारत ५० वर्षे मागे गेला, हीच मोदी सरकारची कामगिरी ठरली, असे नाना पटोले म्हणाले.


हे सुद्धा वाचा :

बिल्डर व दारू विक्रेत्यांच्या भल्याचा विचार करणारे आघाडी सरकार पोलिसांचा भल्याचा विचार कधी करणार, प्रविण दरेकर यांचा सवाल

गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं! : रोहित पवार

मनसेच्या नेत्याने विलासराव देशमुखांबद्दलची सांगितली जुनी आठवण

‘चंपाकली मुर्दाबाद’च्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला चंद्रकांत पाटीलांचा पुतळा

 

Pratiksha Pawar

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

4 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

4 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

5 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

5 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

6 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

16 hours ago