राजकीय

पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथमध्ये आरती करताना कॅमेऱ्यात पाहताना दिसले; नेटकऱ्यांनी फोटो शेअर करत केलं ट्रोल

टीम लय भारी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे आले होते. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरची पायाभरणी केली. यासोबतच त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात पूजेसह आरतीही केली(Narendra Modi: Netizens did photo sharing trolls)

आरती करतानाचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कॅमेराकडे पाहत आहे. या फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Narendra Modi : शेतक-यांना अधिकार दिला, कृषी कायद्यात चुकीचे काय?

Narendra Modi : किसान योजना PM मोदी आज 6 राज्यातील शेतकर्‍यांशी साधणार संवाद, शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवणार 18 हजार कोटी

सामान्य ट्विटर यूजर्ससोबतच विरोधी पक्षांचे नेतेही पीएम मोदींच्या या फोटोवरून टीका करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी लिहिले की, ‘अरे तुम्हाला काय म्हणायचे आहे?’ तर काँग्रेस नेते अनिल यादव म्हणतात, ‘माहित नाही प्रॉब्लेम काय आहे मोदीजी. देव सर्वत्र आहे, पण तुम्हाला ते फक्त कॅमेऱ्यातच दिसतात ही वेगळी गोष्ट.’ सपा नेते राजीव राय यांनी देखील मोदींनी फोटो जीवी म्हणत टोला लगावला. ‘मोदीजी मंदिरात आरती करताहेत, पण लक्ष मात्र कॅमेऱ्याकडे आहे,’ असं ते म्हणाले.

काशी विश्वनाथमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख…

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. या ठिकाणी औरंगजेब आला, तर शिवाजी देखील उभे राहतात, असं मत मोदींनी व्यक्त केलं होतं. याशिवाय मोदींनी अनेक भारतीय पराक्रमांचाही उल्लेख केला.

Narendra Modi : शेतकरी आंदोलन सुरू असताना मोदींची गुरुद्वाराला भेट

PM “Extremely Anguished” By Group Captain Varun Singh’s Death

यावेळी मोदींनी उपस्थितासह देशवासीयांकडून ३ महत्त्वाची वचनं घेतली. तसेच हे वचनं पाळण्याचं आश्वासनही घेतलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे.”

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago