35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईNarendra Modi : किसान योजना PM मोदी आज 6 राज्यातील शेतकर्‍यांशी साधणार...

Narendra Modi : किसान योजना PM मोदी आज 6 राज्यातील शेतकर्‍यांशी साधणार संवाद, शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवणार 18 हजार कोटी

टिम लय भारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याद्वारे शुक्रवारी पीएम किसान योजनेंतर्गत आर्थिक लाभाचा पुढील हप्ता जारी करण्याच्या निमित्ताने भाजपाने ”उत्सव” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपाने कार्यक्रमात एक कोटी शेतकर्‍यांना सहभागी करण्याचे ठरवले आहे. या निमित्त पंतप्रधान नऊ कोटीपेक्षा जास्त लाभार्थींच्या खात्यात 18 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात मोदी सहा राज्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधतील तसेच शेतकर्‍यांसाठी राबवलेल्या इतर उपक्रमांचे त्यांचे अनुभव सांगतील.

यावेळी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींसह अन्य भाजपा नेते देशभरातून पक्षाच्या या कार्यक्रमात सहभागी होती. भाजपाने हा कार्यक्रम अशावेळी आयोजित केला आहे, जेव्हा दिल्लीच्या विविध सीमांवर जीवघेण्या थंडीत शेतकरी मागील 28 दिवसांपासून शेतकरीविरोधी कृषी कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे कायदा रद्द करण्याची मागणी मोदी सरकारने फेटाळली आहे. या आंदोलनाचे पडसाद देशासह जगभरात उमटत आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, भाजपा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा करते. या दिवसानिमित्त पंतप्रधान मोदी पीएम-किसान योजनेंतर्गत देशातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे पाठवतील.

त्यांनी सांगितल की, या उत्सवानिमित्त भाजपा नेते आणि देशभरातील शेतकरी विविध कार्यक्रमात भाग घेतील. देशातील 19,000 पेक्षा जास्त ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील. एकट्या उत्तर प्रदेशात 3000 ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजधानीच्या मेहरौली आणि संरक्षण मंत्री मंत्री राजनाथ सिंह द्वारका सेक्टर 15 मध्ये आयोजित कार्यक्रम सहभागी होतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी