राजकीय

सोनियासमोर नाक घासलं, आठवत नाही का ?, संजय राऊतांवर नरेश म्हस्के यांनी सोडला बाण !

फडणवीस यांचा मक्का – मदिना दिल्ली आहे, पण तुमचं… असा टोला देत खासदार संजय राऊत यांनी दिल्ली वारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राऊत यांना काव्यमय टोला हाणला आहे तोही ट्विटरवरून. ‘सोनियासमोर नाक घासलं, आठवत नाही का ?’ असे म्हणत सोबत ठाकरे कुटुंबांचे सोनिया गांधी यांच्या बरोबरचे फोटोही शेअर केले आहेत. आता याला संजय राऊत कोणत्या भाषेत उत्तर देतात हे पहावे लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार बरोबर घेऊन बंड केले. जूनमध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याची एक संधीही सोडली नाही. ५० खोके, एकदम ओके, मिंधे, गद्दार अशा शब्दात संजय राऊत एकनाथ शिंदे आणि फुटलेल्या आमदार आणि खासदारांवर टीका करतात.

सकाळपासून ही टीका सुरू असल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटातून पक्ष प्रवक्ते तसेच ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार संजय शिरसाट, शीतल म्हात्रे, मंत्री गुलाबराव पाटील हे संजय राऊत यांच्यावर तुटून पडत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटाकडून दररोज होणाऱ्या या आरोपाच्या युद्धात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, आमदार राम कदम, अतुल भातखळकर किल्ला लढवत असतात.

राज्यातील १५ महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊत दिवसेंदिवस आरोपांची सुरी धारधार करत आहेत. हे करताना त्यांची जीभ कधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर घसरते. ते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही घसरतात.

हे सुद्धा वाचा

नोकरीची संधी !!! इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये दहावी/बारावीसाठी अप्रेंटिस भरती

अरबी समुद्रात चक्रीवादळ; मुंबई, ठाण्यात पाऊस कधी पडणार ?

NIRF च्या रँकिंगमध्ये मद्रास आयआयटी सलग पाचव्या वर्षी अव्वलच

यामुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरला असल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या राजकारणात एक सुसंस्कृत वातावरण होते. एखादा सत्ताधारी आमदार विरोधी पक्षाच्या आमदाराला सहज भेटत असे. आता मात्र एखादा सत्ताधारी आमदार विरोधी पक्षाच्या आमदाराला भेटला तर त्याची बातमी होते. बरेच तर्क – वितर्क लावले जातात.

नरेश म्हस्के यांनी ट्विटरवर कवितेतून संजय राऊतांवर बाण सोडला.

दिल्लीत कोण धावत गेलं
आठवत नाही का ?
सोनियासमोर नाक घासलं, आठवत नाही का ?

प्रणव मुखर्जी भेटून गेले
बाळासाहेबांना ,
पोटशूळ उठला होता सोनिया बाईंना….

बाळासाहेबांचे शत्रू तुमचे मित्र झाले ना?
पाया पडायला दिल्ली वाऱ्या करू लागले ना…!

सेना-भाजप युती जुनी
त्या शिवाय नाही कुणी…
बाळासाहेबही हेच सांगत
आठवत नाही का???

साऱ्या देशाचं केंद्र दिल्ली
त्याला जोडलेली प्रत्येक गल्ली
तुम्हीही अशाच गल्लीतले
आठवत नाही का ?

विवेक कांबळे

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

11 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

11 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

12 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

12 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

14 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

14 hours ago