‘फडणवीसांचे ‘ते’ कर्तृत्व म्हणजे राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब’

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून आलो, असं थेट वक्तव्य केल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. फडणवीस यांना ब्रिटीश सरकारची उपमा दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ((NCP Sharadchandra Pawar) ट्विट करत फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, आमदार रोहित पवार यांनीदेखील हाच मुद्दा पकडत फडणवीसांवर तोफ डागली आहे. (NCP Sharadchandra Pawar reaction on Devendra Fadnavis statement I Came Again But I Came By Splitting The Two Parties)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फडणवीस यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करताना भली मोठी कॅप्शन लिहिली आहे. फडणवीस जेव्हा राजकीय पक्ष फोडण्याला स्वतःचं कर्तृत्व समजत असतील तर ही महाराष्ट्राच्या दैदीप्यमान राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने म्हटलं आहे.

काय म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने…

मुघल असो की इंग्रजांचं राज्य प्रत्येकवेळी महाराष्ट्राविरोधात डाव साधला गेला होता तो फोडाफोडीच्या कुटनितीचा. पण दिल्लीच्या तख्तासाठी लाचार होऊन हिच फोडाफोडीची स्वार्थी कुटनीती पुन्हा महाराष्ट्रात भाजपकडून अवलंबली जात आहे.

‘मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून’, फडणवीस जरा स्पष्टच बोलले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा राजकीय पक्ष फोडण्याला स्वतःचं कर्तृत्व समजत असतील तर ही महाराष्ट्राच्या दैदीप्यमान राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब आहे.

परंतु राज्यातील जनता आता या कुटनीतीला फसणारी नाही. फोडाफोडी करून असंविधानिक पद्धतीने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला राज्यातील जनता धडा शिकवणारच!

रोहित पवारांची पोस्ट काय?

राज्यातील पक्ष आणि कुटुंबं फोडाफोडीचे #महामेरू कोण आहेत याबाबत लोकांमध्ये चर्चा होती.. पण आज खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःच याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झालं.

चंद्रशेखर बावनकुळेंनी डिवचले, राहूल गांधींच्या सभेपूर्वी बाळासाहेबांची काढली आठवण !

पण #फोडा_आणि_राज्य_करा ही ब्रिटिशांची निती राबवणाऱ्या भाजपाला राज्यातील स्वाभिमानी जनताच #धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही! अशा आशयाचे ट्विट करत रोहित पवार यांनी #ब्रिटिशांच्या_विचारांचे_वारस असा दिला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

कॉंग्रेस न होती तो क्या होता ? या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं.

‘मी पुन्हा येईन’ अशा माझ्या वक्तव्यावरुन नेहमीच प्रश्न केला जातो. मी पुन्हा येईन हे केवळ वाक्य नव्हतं, त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं.. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं.

‘काँग्रेसमुळे देश अखंड राहिला…’, संजय राऊतांनी केलं काँग्रेसचं तोंडभरून कौतुक

पण, उध्दवजी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं नव्हतो, आलो तेव्हा टीका झाली, मला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितल.

धनश्री ओतारी

Recent Posts

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

19 seconds ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

20 mins ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

13 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

13 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले…

13 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

15 hours ago