‘काँग्रेसमुळे देश अखंड राहिला, इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला.’ असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. गेल्या ६३ दिवसापासून काँग्रेसची (Congress )सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. दरम्यान, आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. अशातच सभेपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे. आज रविवार १७ मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.
या रॅलीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले संजय राऊत?
जर या देशात काँग्रेस (Congress ) नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील हे सगळे काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. असं सांगत, काही मतभेद असतील परंतु जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती असा टोला संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.
सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो
काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसते. हा देश बुवा, महाराज, जादूटोणा, तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असता जो आज गेलेला आहे. लाल बहादूर शास्त्री मिळाले, राजीव गांधी, इंदिरा गांधी मिळाल्या. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते.
जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. काँग्रेस नसती तर हे झाले नसते. त्यामुळे भाजपाने काँग्रेसचे ऋण व्यक्त केले पाहिजे. काँग्रेसमुळे आज तुम्ही स्वातंत्र्याची सूर्यकिरणे पाहताय असं त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी PM मोदींनी देशवासीयांना दिली नवी गॅरंटी
#WATCH | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "If there was no Congress the country would not have got independence, the country would not have got leadership & we would not have made progress in science and technology…There are a lot of such things which the BJP will never… pic.twitter.com/6HgxgpKazE
— ANI (@ANI) March 17, 2024